Yashomati Thakur: काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना भाजप खासदार अनिल बोंडे यांची जीभ घसरली होती. यांचा डीएनए ओबीसीसाठी नाही. इंग्रजांची चाकरी केली आणि ठाकूर पदवी मिळवली, असे बोंडे म्हणाले होते. यानंतर यशोमती ठाकूर यांनी देखील जोरदार पलटवार केला आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, "अनिल बोंडे यांनी दंगल घडवून खासदारकी मिळवली. एवढा शिकलेला माणूस अडाण्यासारखा बोलतो. हे चुकीचे आहे. महिला आमदारांच्या घराण्याबद्दल बोलायचं, हे चुकीचं आहे."
यशोमती ठाकूर यांनी आडनावाचा इतिहास सांगण्यासाठी भाटांना पाचारण केले. सन १७०० मध्ये ठाकूर नाव पडवल्याचे भाटांनी पुराव्याच्या आधारे सांगितलं.
भाजपची ओबीसी यात्रा अमरावती जिल्ह्यामध्ये यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघ तिवसा येथे आली होती. त्यावेळी कार्यक्रमात बोलताना अनिल बोंडे यांची जीभ घसरली. त्यानंतर अनिल बोंडे आणि यशोमती ठाकूर यांच्यातील संघर्ष पेटला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.