कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

BJP announced candidates: भारतीय जनता पक्षाने कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
bjp
bjp
Updated on

मुंबई- भारतीय जनता पक्षाने कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले आहेत. याठिकाणी कोकण विभाग पदवीधरसाठी निरंजन डावखरे, मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी किरण रविंद्र शेलार आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ हिरामन दराडे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपे पत्रक काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २६ जून रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी निवडणुकीची तारीख पुढे ढकलली होती. कोकण विधान परषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये मनसे, भाजप आणि शिंदेची शिवसेना समोरासमोर आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष असणार आहे.

bjp
Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

लोकसभेसाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर भाजपचे निरंजन डावखरे असणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी देखील आपला उमेदवार जाहीर केला असून संजय मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीच्या पक्षांमध्येच ही लढत होणार असल्याचं स्पष्ट आहे.

भाजप आधी मनसेने पानसे यांची उमेदवारी जाहीर केली. मनसेने लोकसभेसाठी भाजपला पाठिंबा दिलेला असल्याने याठिकाणी भाजप उमेदवार देणार नाही अशी चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे डावखरे यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली होती. पण, पाठिंबा हा लोकसभेपुरताच होता असं आता स्पष्ट आहे. शिदेंनी देखील उमेदवार जाहीर करुन सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे.

bjp
Nandurbar Lok Sabha Constituency : निकालाचे काऊंट डाऊन सुरू! भाजप-कॉंग्रेसच्या नेते -पदाधिकाऱ्यांमध्ये वाढली धकधक

भाजपचे निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून दोनवेळा आमदार आहेत. ते पुन्हा मैदानात असतील अशीच दाट शक्यता होती. पण, मनसेने उमेदवार जाहीर केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्रा भाजपने यावरील दावा सोडला नसल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, पानसे यांनी भाजपचा उमेदवाराला निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.