Assembly Election : भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग! महाराष्ट्रात भूपेंद्र यादव यांच्याकडे दिली मोठी जबाबदारी

भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान तर सहप्रभारी म्हणून खासदार बिप्लब देव यांची नियुक्ती केली आहे.
BJP appointed Bhupendra Yadav as Election In-Charge and Ashwini Vaishnav as Co-In-Charge upcoming Assembly Elections
BJP appointed Bhupendra Yadav as Election In-Charge and Ashwini Vaishnav as Co-In-Charge upcoming Assembly Elections
Updated on

नवी दिल्ली : आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची तर सह प्रभारी म्हणून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका कधी होणार, याबाबत साशंकता असली तरी पक्षाने निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांची नेमणूक केली आहे.

भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान तर सहप्रभारी म्हणून खासदार बिप्लब देव यांची नियुक्ती केली आहे. तर झारखंडसाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि सहप्रभारी म्हणून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तात्काळ प्रभावाने वरील नियुक्त्या लागू होतील, असे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी म्हटले आहे.

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा

दरम्यान, पंजाब आणि प. बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पक्षाने जालंधर पश्चिम मतदारसंघात शीतल अंगुराल यांना संधी दिली आहे. तर प. बंगालमधील रायगंजमध्ये मानस कुमार घोष, राणाघाट दक्षिणमध्ये मनोज कुमार विश्वास, बगदा मतदारसंघात विनयकुमार विश्वास आणि माणिकतला येथून कल्याण चौबे भट्टाचार्य यांना मैदानात उतरविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.