देशमुखांच्या अटकेवर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मोदीजींना प्रणाम...'

देशमुखांच्या अटकेवर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मोदीजींना प्रणाम...'
Updated on

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काल रात्री उशीरा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. जवळपास १४ तास चाललेल्या चौकशीनंतर त्यांची ही अटक करण्यात आली आहे. देशमुख यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Anil Deshmukh money laundering case update) यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनिल देशमुख यांचे सर्व दरवाजे बंद झालेत म्हणून ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. तसेच मोदी पंतप्रधान झाल्यापासून तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू दे, जो दोषी आहे त्याला शिक्षा मिळणारच, हे सिद्ध होतंय.. आता बाकीचे देखील जे सुपात आहेत ते जात्यात जातील, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

देशमुखांच्या अटकेवर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मोदीजींना प्रणाम...'
'दोन्ही अनिल शोधून त्यांचे मास्टरमाईंड गाठा'; देशमुखांच्या अटकेनंतर भाजपची प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अटक झाली. काल मी अनेक ठिकाणी मांडताना असं म्हटलं होतं की, अनिल देशमुख हे ज्याअर्थी ईडीच्या कार्यालयात स्वत:हून हजर झालेले आहेत, त्याअर्थी त्यांचे सगळे मार्ग बंद झाल्याचं आणि आता पर्याय उरला नसल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. शेवटी रात्री उशीरा त्यांना अटक झाली. पंतप्रधान मोदी 2014 साली पंतप्रधान झाल्यापासून तो भाजपचा असो वा काँग्रेसचा कार्यकर्ता असो, जो दोषी आहे, त्याला शिक्षा मिळणार. मात्र, देशमुखांच्या अटकेमुळे राजकीय आणि सामाजिक जीवन खूप हादरलं. इतक्या मोठ्या नेत्याने जर समाजाशी द्रोह केला तर समाजाने कुणावर विश्वास ठेवायचा? हा प्रश्न पडलाय. तरी अजूनही चौकशी सुरु असल्यामुळे ते दोषीच असल्याचा निवाडा मी आताच करणार नाही, ते न्यायाधीश ठरवतील, असंही त्यांनी म्हटलंय.

देशमुखांच्या अटकेवर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मोदीजींना प्रणाम...'
देगलूर-बिलोली पोटनिवडणूक : काँग्रेसकडून भाजपला धोबीपछाड, महाविकास आघाडीची सत्ता कायम

पुढे ते म्हणाले की, मात्र, देशमुखांच्या अटकेमुळे हा संदेश गेला की, कुणालाही सहन केलं जाणार नाही. मोदी ज्याला झिरो टॉलरन्स म्हणतात. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात संजय राठोडांचा राजीनामा झाला, अनिल देशमुखांचा झाला. ज्याने समाजाला सुरक्षितता द्यायची असते अशा पदावरचा व्यक्तीच अटकेत गेल्याने समाजजीवन अस्थिर झालेलं आहे. याच क्रमाने जे सुपात आहेत, ते जात्यात जातील. त्यामुळे समाज आनंदी होईल. पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेच्या आधारे धाक निर्माण करणाऱ्या मोदीजींना प्रणाम करतो, असंही त्यांनी म्हटलंय.

दुसरीकडे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलंय की, अखेर देशमुख यांना अटक झाली आहे. वसूली कांड प्रकरणातील ही पहिली अटक असली तरी ही प्याद्याची अटक आहे. अनिल देशमुख यांना गृहमंत्री कोणी केले? त्यांच्याबरोबर आणखी अनिल कोण होतं? आणि हे दोन्ही अनिल मिळून आपला वाटा कोणाला द्यायचे? याचा सुद्धा छडा लावण्याची गरज आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की, येणाऱ्या काळात ईडी आणि सीबीआय या केवळ दोन अनिलवर न थांबता त्यांचे जे मास्टरमाईंड्स आहेत, त्यांच्यापर्यंतही पोहोचतील आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या पैशांचा शोध घेऊन भ्रष्टाचाराची ही किड जी महाभकास आघाडीने लावलीय, ती नष्ट करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.