Veer Savarkar : उद्धव ठाकरेंनी चूक सुधारली असेल तर…; चंद्रकांत पाटलांचं विधान

BJP chandrakant Patil on uddhav Thackeray statment on rahul gandhi criticizes veer savarkar  politics
BJP chandrakant Patil on uddhav Thackeray statment on rahul gandhi criticizes veer savarkar politics
Updated on

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात राजकरणा तापलं आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आणि शिंदे गट आक्रमक झाले आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मात्र राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाहीत असं म्हटलं यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेले चंद्रकांत पाटील म्हणाले की, "आजानची स्पर्धा घेण याकडे गाडी चालली होती ती ट्रॅकवर आली. लव्ह जिहाद, धर्मांतरण या विषयावर त्यांच्याही मनात आग पेटली ही चांगली गोष्ट आहे. ही कॉंग्रेसच्या पेटू शकत नाही. कारण ही त्यांची वोटबॅंक आहे. ही वोटबॅंक उद्धव ठाकरें यांची कधीच नव्हती. सरकार आणि वोटबॅंकपायी त्यांना मोह झाला आणि तेही त्यांच्या सुरात सूर मिसळायला लागले. जर सावरकरांच्या निमत्ताने ही चूक झाली हे लक्षात आलं असेल तर ती सुधारणे सर्वसामान्यांना आवडेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा - Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

BJP chandrakant Patil on uddhav Thackeray statment on rahul gandhi criticizes veer savarkar  politics
Har Har Mahadev : आता तरी डोळे उघडतील का? 'हरहर महादेव'वरून आव्हाडांचा राज ठाकरेंना संतप्त सवाल

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, "याचा अर्थ त्यांनी भाजपशी समझोता करून सरकार स्थापन केलं पाहीजे असं काही नाही. आता आम्ही खूप पुढे गेलो. आता आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सहज सरकार आणू, त्या निवडणुकांमध्ये आम्ही इतके मजबूत असू. त्यामुळे आम्हाला शिंदे यांची शिवसेना पुरेशी आहे.""असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

BJP chandrakant Patil on uddhav Thackeray statment on rahul gandhi criticizes veer savarkar  politics
Mantralaya News: प्रेयसीला न्याय मिळेना! हतबल तरुणाने थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून मारली उडी; आता…

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी जे बोलले ते चूकच आहे. आमच्याबद्दल सांगायचं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात आदर आहे. स्वातंत्र्यावीरांबद्दल प्रेम कोण व्यक्त करतंय हे देखील पाहावं. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. सावरकरांनी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं ते आज धोक्यात आलं आहे. ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्यवीरांप्रमाणे आधी वागायला शिका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.