Maratha Reservation : मराठा समाजानं CM शिंदेंचं अभिनंदन करावं; शिवतारेंच्या त्या विधानानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया

राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे.
Maratha Reservation : मराठा समाजानं CM शिंदेंचं अभिनंदन करावं; शिवतारेंच्या त्या विधानानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया
Updated on

राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत काल संपली. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेत मराठ्यांना आरक्षण देऊ असं जाहीर केलं. याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मराठा समाजाने अभिनंदन केलं पाहिजे असे चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावरील पार पडलेल्या दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे सांगितलं. पण त्यांच्या नेते विजय शिवतारे यांनी जरांगेंची मागणी आधारहीन आहे, त्यांनी अभ्यासकरून मागणी करावी असं म्हटलं. याबद्दल भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, मी एकनाथ शिंदेंच अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार माणतो की, छत्रपती शिवरायांना साक्षी माणून मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. मला अभिमान आहे की, त्यांनी सांगितलं की काहीही झालं तरी चालेल, माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं की मराठा समाजानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं पाहिजे की जबाबदारी स्वीकारली आहे.

Maratha Reservation : मराठा समाजानं CM शिंदेंचं अभिनंदन करावं; शिवतारेंच्या त्या विधानानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया
Nilesh Rane Retirement : निलेश राणेंचा राजीनामा स्थान बळकट करण्यासाठी?

देवेंद्र फडणवीस यांनी एकदा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, उद्धव ठाकरे यांनी घालवलं, आता एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे, मी त्यांचे आभार माणतो. महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी एकनाथ शिंदेंकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे, भाजपची एकमुखी मागणी आहे. एवढंच आहे की कुणावर अन्याय करू नये , अशे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Maratha Reservation : मराठा समाजानं CM शिंदेंचं अभिनंदन करावं; शिवतारेंच्या त्या विधानानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया
Maratha Reservation : ना अन्न-पाणी, ना वैद्यकीय उपचार, जरांगे पाटलांनी दुसरं आमरण उपोषण सुरू करताना केली भूमिका स्पष्ट

निलेश राणेंवर बावनकुळेंची प्रतिक्रिया

निलेश राणे यांनी सक्रीय राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की त्यांना लोकसभेची वगैरे अपेक्षा नाहीये. पक्षामध्ये काम करताना व्यक्तीगत निर्णय जाहीर करण्याचा आधिकार नसतो, पण त्यांना काहीतरी वाटलं असेल. पण मला माहिती आहे की जो पक्षादेश निलेश राणेंना देण्यात येईल तो ते ऐकतील आणि भाजपसाठी पुन्हा सक्रीय काम करतील असे चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.