BJP Politics: 'उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला पण अजित पवारांसोबत...' भाजपच्या जेष्ठ नेत्याचं सुचक विधान

Maharashtra politics
Maharashtra politics esakal
Updated on

Maharashtra politics : भाजप शिंदेंच्या शिवसेनेसोबत सत्तेत आहेत तरी देखील भाजपच्या मनात २०१९ च्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस सोबत सरकार स्थापन केले होते. त्याचा रोष अजून ही त्यांच्या मनात आहे.

आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यावेळी खंत बोलून दाखवली ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद नाही तर मनभेद झालेत, त्यांनी आमचा विश्वासघात केला, त्यामुळे त्यांच्या सोबत भाजप कधीही जाणार नाही, त्यांच्यासाठी भाजपची दारं सध्यातरी बंद आहेत. असं बावनकुळे म्हणाले. (Latest Marathi News)

Maharashtra politics
Covid-19 in Maharashtra : "मास्क बंधनकारक नसले तरी..."; आरोग्यमंत्र्यांचं राज्यातल्या जनतेला आवाहन

तर अजित पवारांवर बोलताना म्हणाले, अजित पवारांनी कधीही विश्वासघात केला नाही, त्यांच्याशी मतभेद आहे, पण मनभेद कधीही झालेला नाही. बावनकुळे यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा चालू झाल्या आहेत. अनेक वर्ष मित्र असलेले उद्धव ठाकरे आज भाजप शत्रू मानत आहेत, तर अनेक वर्ष विरोधात असलेल्या शत्रूला मित्र मानत आहेत.

Maharashtra politics
Sushma Andhare: फडणवीसांच्या डायलॉगबाजीवर अंधारे म्हणतात, 'तुमच्या घरात एक बाई घुसली अन्...'

 भाजप-शिंदे गटामध्ये नाराजीनाट्य सुरू? 

जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेच्याअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमांचा धडाका पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लावला आहे. मात्र या कार्यक्रमांना जिल्ह्यातील भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन व इतर खासदारांना बोलवलं जात नाही. भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटलांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

जल जीवन मिशन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आलेली योजना आहे. या योजनेसाठी केंद्राने पैसे दिले आहेत. त्यामुळे केंद्राचा प्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉलप्रमाणे खासदारांना व जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन यांना बोलवल्या समाजामध्ये चांगलं चित्र निर्माण होईल, जलजीवन मिशन योजनेचे कार्यक्रम सर्वसमावेशक व्हावे अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे. (Marathi Tajya Batmya)

शिवसेनेवर होत असलेले खोके, ओके वगैरे आरोप दूर करायचे असेल व खरोखर चांगलं काम दाखवावे लागणार आहे. कामाच्या माध्यमातून आरोप दूर करता येईल, असे उन्मेष पाटील यांनी गुलाबराव पाटील यांचं नाव न घेता टोला लगावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.