Lok Sabha Election : लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होणार का? भाजप प्रदेशाध्यक्षांचं महत्वपूर्ण विधान

BJP chandrashekhar bawankule on whether Lok Sabha and Assembly elections will be held together
BJP chandrashekhar bawankule on whether Lok Sabha and Assembly elections will be held together
Updated on

देशासह राज्यात आगामी वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असणार आहे. पुढील वर्षभरात राज्यात महापालिका, विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणूका या एकत्र घेण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे.

या चर्चेदरम्यान भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणूका एकत्र होतील का? याबद्दल महत्वपूर्ण विधान केलं आहे. या आगामी लोकसभा-विधानसभा निवडणूका एकत्र होणार नाहीत असे बावनकुळे म्हणाले आहेत.

लोकसभा- विधानसभा निवडणूका एकत्र होणार असल्याच्या चर्चेवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, मला विधानसभा आणि लोकसभा निवडणूका एकत्र होतील अशी शक्यता वाटत नाही. आणि का व्हाव्यात? लोकसभेनंतप पुढे सहा-साडेसहा महिने वाचतात. निवडणूका एकत्र होण्याचं काही कारणच नाही. त्यामुळे मी तरी म्हणेन की लोकसभा विधानसभा निवडणूका एकत्र होतील अशी शक्यता दिसत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

BJP chandrashekhar bawankule on whether Lok Sabha and Assembly elections will be held together
Monsoon Update : यंदा मुंबईत 'या' तारखेला येणार मान्सून! उष्णतेपासून दिलासा कधी? तज्ज्ञांनी दिली माहिती

दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता धुसर होताना दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत.

तसेच २०२४ लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपांवर बोलताना अजित पवार म्हणले की, मागच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होती. पण आता ठाकरे गटसोबत आहे. त्यामुळे तिघांनी ४८ जागा वाटपांबद्दल चर्चा करावी, तसेच २८८ विधानसभेच्या जागा वाटपांवरही निर्णय घ्यायला हवा, तसेच जागा वाटप करताना प्रत्येक पक्षातील दोन नेत्यांमध्ये बसून चर्चा होईल.

BJP chandrashekhar bawankule on whether Lok Sabha and Assembly elections will be held together
Shivsena : …माझा ३३वा नंबर होता; ठाकरेंसोबत गद्दारीच्या आरोपांवर गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.