Uddhav Thackeray News : 'मोदीजींना हुकूमशाह म्हणणारे तुम्ही...'; भाजपकडून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Updated on

ठाकर गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गट आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली. शनिवारी ठाण्यात झालेल्या उत्तर भारतीय हिंदी भाषिकांच्या मेळाव्यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाजप आणि पंतप्रधान मोदींवर देखील टीकास्त्र सोडलं. दरम्यान या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रधानमंत्री दोन दिवसात महाराष्ट्रात येत आहेत, ते गद्दारांसोबत बसणार आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांचा सत्कार करणार आहेत. हेच आपलं हिंदुत्व आहे? ज्यांच्यावर ७० हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना सरकार मजबूत असताना देखील सत्तेत घेतलं दुसरं कोणी मिळालं नाही का? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

तसेच आज आपला देश एका अशा वळणावर आला आहे जिथं २०२४ मध्ये नाही झालं तर आपली ट्रेन सुटली. त्यानंतर आपला देश आपल्या हातून गेला. या नालायक, हुकुमशाहांच्या हातात देश जाईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले, यावर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर ओसरणार; जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज

बावनकुळे काय म्हणाले...

ठाकरेंच्या ठाण्यातील मेळाव्यातील टीकेनंतर भाजपकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटच्या माध्यामातून ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "बऱ्याच दिवसानंतर उबाठाचे नेते उद्धव ठाकरे काल घराबाहेर पडले आणि मजल दर मजल करत त्यांनी ठाणे गाठले. आणि कधी नव्हे ते त्यांना उत्तर भारतीय मतदारांची आठवण झाली. आणि पुन्हा एकदा पंतप्रधान मोदीयांच्यावर टीका केली."

"देशासाठी मोदीजी काय करतात याचे प्रमाणपत्र उद्धव ठाकरे यांनी देण्याची गरज नाही. मोदीजींमुळे देशाची मान उंचावली आहे. पण उद्धवजी तुमच्या हिंदुत्वविरोधी भूमिकेमुळे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकाची मान शरमेनं खाली झुकली आहे. मोदीजींना हुकूमशाह म्हणणारे तुम्ही सोनिया गांधींपुढे मात्र लोटांगण घालत आहात." असेही बावनकुळे म्हाणाले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: "2024 मध्ये नाही झालं तर आपली ट्रेन..."; उद्धव ठाकरेंचं उत्तर भारतीयांना एकत्र येण्याचं आवाहन

२०२४ नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल

"माझे कुटुंब माझी जबाबदारी हे फक्त तुमच्या भाषणात आहे प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र आदित्य ठाकरेंना मंत्री करताना तुम्हाला सच्चा शिवसैनिक दिसला नाही. त्या प्रामाणिक शिवसैनिकाला दूर ठेवले म्हणूनच कधीकाळी हजारोंच्या उपस्थितीत सभा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंना नाट्यगृहात एकपात्री प्रयोग करावा लागला. तुमचे असेच नाट्य सुरू राहिले तर २०२४ नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल." असा खोचक टोलाही बावनकुळे यांनी लगावाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.