राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. यादरम्यान संगमनेर तालुक्यातील धांदरफल येथे भाजपचे नेते सुजय विखे यांच्या संकल्प सभेदरम्यामन जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करम्यात आले. यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. यानंतर आता भाजपकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यतक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.