'कुणी कुणाला जोडे मारायचे, कुणासोबत जायचं हे त्यांनी ठरवावं'

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
Updated on

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. सरनाईकांच्या पत्रावर राजकीय प्रतिक्रिया येत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरनाईक यांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला आहे. यावेळी फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरही टीका केली. प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच भाजपसोबत युती करावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. पण शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते पुण्यात बोलत होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'भाजप स्वबळावरच लढत आहे. कुणी कुणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे, हे त्यांनी ठरवावे. कुणासोबत कुणी जायचं हे त्यांनाच ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या बांधीलकीतून आम्ही काम करत राहू.' आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. जनतेचे प्रश्न सरकारसमोर मांडत आहोत. आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो. पण आमच्याकडे बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ, असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेचे स्वागतच - रामदास आठवले

आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना आणि भाजपने युती करावी, अशी स्वागतार्ह भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशी युती करावी. त्यांना दोन्ही काँग्रेसच्या दबावाखाली मुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करणे अवघड जात आहे.

शिवसेनेचा अंतर्गत मामला - नाना पटोले

हा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे. त्याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या मुद्द्यावर मत व्यक्त करण्याची गरज नाही, असे मला वाटते.

सच्च्या शिवसैनिकाची भावना - चंद्रकांत पाटील

प्रताप सरनाईक यांनी मांडलेले मत हीच सच्च्या शिवसैनिकाची भावना आहे. हेच आम्ही त्यांना (शिवसेनेला) १८ महिन्यांपूर्वी सांगत होतो. तुमची आघाडी अनैतिक किंवा अशास्त्रीय आहे. काँग्रेसची भूमिका ही अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याची राहिलेली आहे आणि आता तुम्ही तेच करत आहात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.