Dharmendra Pradhan : 'समर्थ रामदास नसते, तर शिवराय झाले नसते'; केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

भाजप नेत्याच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे.
BJP Dharmendra Pradhan On Chhatrapati Shivaji Maharaj And ramdas swami Controversial statement rak94
BJP Dharmendra Pradhan On Chhatrapati Shivaji Maharaj And ramdas swami Controversial statement rak94
Updated on

समर्थ रामदास नसते तर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते, असं वक्यव्य केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. गुजरातमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे.

समर्थ रामदास नसते तर छत्रपती शिवाजी महाराज बनले नसते, शिवाजी बनवण्याच्या फॅक्टरीचे सर्व समर्थ गुरू येथे बसले आहेत असं वक्तव्य धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यामुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

याविधानानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा जणीवपूर्वक सातत्याने वाद सुरू ठेवला जातो, कारण बाबासाहेब पुरंदरेनी हा विषय मांडला होता आणि शेवटी त्यांनी माफी मागीतली होती.

BJP Dharmendra Pradhan On Chhatrapati Shivaji Maharaj And ramdas swami Controversial statement rak94
Israel Hamas War : हमास इस्त्राइल युद्धात आतापर्यंत ९००० हून अधिक मृत्यू; नेतन्याहू म्हणाले, हे दुसरं स्वतंत्र्ययुद्ध...

भानुसे पुढे बोलताना म्हणाले की, जे गुरू आहेत म्हणतात त्यांना आमचे साधे प्रश्न आहेत,पहिला प्रश्न जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा १८ देशातून लोक आले होते. त्या काळात रामदास जीवंत होते, ते गुरु होते तर शिवराय रामदासांना कसे विसरले? दुसरा प्रश्न असा आहे की, शिवरायांचा राज्याभिषेक करायला रामदास होते तर गागाभट्टांना का बोलवलं? तिसरा प्रश्न जर रामदास गुरू होते तर ब्राम्हणांनी राज्याभिषेकाला विरोध केला तेव्हा रामदासांनी त्यांना विरोध का केला नाही?

BJP Dharmendra Pradhan On Chhatrapati Shivaji Maharaj And ramdas swami Controversial statement rak94
Matthew Perry Passed Away: 'फ्रेंड्स'मधील 'चँडलर बिंग' कालवश! अभिनेता मॅथ्यू पेरीचं निधन, राहत्या घरी आढळला मृतदेह

रामदास कुठे होते? राज्याभिषेकात त्यांचा उल्लेखच नाही. रामदास आणि शिवरायांची भेट झाल्याचा पुरावा सापडत नाही. एक पत्र सापडतं ज्यामध्ये मठासाठी देणगी मागण्यात आली होती. त्यामुळे रामदास हे शिवरायांचे गुरू नव्हते हे इतिहासाने सिद्ध केलं आहे असेह भानुसे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.