मुंबई : मद्यावरील कर कमी (Alcohol tax) केल्यानंतर बेवड्यांचे सरकार अशी टीका करणारे भाजप नेते (bjp leaders) आता, राज्याच्या अर्थसंकल्पातील जनहिताच्या तरतूदींचे स्वागत करीत नाहीत. मध्य प्रदेशातील (Madhya pradesh) मद्यावरील करसवलत त्यांना चालते. म्हणजेच भाजपच्या राज्यात 'पवित्र' सोमरस अन महाराष्ट्रात पावशेर असा भाजपचा समज आहे का, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव श्रीरंग बरगे (shrirang barge) यांनी लगावला आहे.
यापूर्वी कोरोनाकाळात राज्य सरकारने मद्यावरील कर कमी केल्यावर, हे तर बेवड्यांचे सरकार आहे, अशी टीका भाजप नेत्यांनी केली होती. त्यानुसार आता राज्य अर्थसंकल्पातील चांगल्या तरतूदींची प्रशंसा करण्याचा मोठेपणा भाजपने दाखवावा, असेही बरगे यांनी सुनावले आहे. राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी अनेक चांगल्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. शेततळ्यांसाठी तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदाने देण्यात आली आहेत. व्यापाऱ्यांसाठी अभय योजना जाहीर झाली आहे.
तर सीएनजी वरील करात कपात केल्याने गृहिणींसह सर्वसामान्यांनाही मोठाच दिलासा मिळाला आहे. राज्यात व्यापार-उद्योग वाढावेत, स्टार्टअपना प्रोत्साहन मिळावे, आदिवासी विभागातही कौशल्य प्रशिक्षण मिळावे यासाठीही अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. या तरतुदींचेही भाजपने स्वागत करावे, चांगल्याला चांगलेच म्हणावे, असेही बरगे यांनी सुनावले आहे.
महाराष्ट्रात मद्यावरील कर कमी झाल्यावर भाजपने टीका केली. मात्र मध्य प्रदेशातही मद्य विक्रीला प्रोत्साहन देणाऱ्या योजना जाहीर झाल्या होत्या. त्या राज्यातही मद्यावरील कर कमी केले होते. तरीही त्यावर मद्यप्रदेश अशी टीका कोणीही केली नाही. म्हणजेच भाजप राज्यात पवित्र सोमरस आणि काँग्रेस राज्यात पावशेर, असा भाजप नेत्यांच्या दृष्टीने फरक आहे का, अशी खिल्लीही बरगे यांनी उडवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.