Loksabha Election: भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव वगळलं; काय आहे कारण?

Loksabha Election: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून नवी यादी दिली आहे. या पत्रात शिंदे आणि पवार यांच्या नावाचा समावेश नाही.
BJP drops CM Eknath Shinde Deputy CM Ajit Pawar from list of star campaigners in Maharashtra
BJP drops CM Eknath Shinde Deputy CM Ajit Pawar from list of star campaigners in Maharashtra Esakal
Updated on

राज्यासह देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. देशभरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. सभा, बैठका दौरे, प्रचार यांना सुरवात झाली आहे. या दरम्यान, भाजपने प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासब अन्य बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश होता. मात्र, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून स्टार प्रचारकांच्या नावांची नवी यादी दिली आहे. या पत्रात शिंदे आणि पवार यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नसल्याची माहिती आहे.(BJP drops CM Eknath Shinde Deputy CM Ajit Pawar from list of star campaigners in Maharashtra)

केंद्रातील सत्ताधारी पक्ष आणि महाराष्ट्रातील सत्तेत भागीदार असलेल्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) शुक्रवारी आपल्या स्टार प्रचारकांची सुधारित यादी निवडणूक आयोगाला सादर केली, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ४० जणांच्या नावांचा समावेश आहे. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भाजपने महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे त्या यादीतून हटवली आहेत. शिंदे हे शिवसेनेच्या वेगळ्या गटाचे प्रमुख आहेत, तर अजित पवार हे शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेगळ्या गटाचे प्रमुख आहेत. या नेत्यांची नावे जुन्या यादीत समाविष्ट होती.

BJP drops CM Eknath Shinde Deputy CM Ajit Pawar from list of star campaigners in Maharashtra
चहा-नाष्टा, जेवण, नारळ, हार, शालीचा दर निश्चित! वाचा कोणत्या वस्तूचा दर किती? अर्ज भरल्यापासून द्यावा लागणार हिशोब; प्रत्येक उमेदवाराला ९५ लाखांच्या खर्चाची मर्यादा

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून नवीन यादी दिली आहे. सिंह यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की, "ही यादी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या उर्वरित लोकसभा मतदारसंघांसाठी वैध मानली जाऊ शकते, जोपर्यंत आम्ही इतर कोणत्याही सुधारित यादी पाठवत नाही."

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती आणि भाजपने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. स्टार प्रचारकांचे उल्लंघन केले आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राष्ट्रीय पक्षांना 40 स्टार प्रचारकांना उमेदवारी देण्याची परवानगी आहे.

BJP drops CM Eknath Shinde Deputy CM Ajit Pawar from list of star campaigners in Maharashtra
Weather Update: पुन्हा रेनकोट, छत्र्या बाहेर काढा; नागपुरात मुसळधार, तर राज्यात गारपिटीसह पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यातील लोकसभेच्या एकूण 48 जागांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भात १९ एप्रिलला मतदान होणार आहे, तर शेवटच्या टप्प्यात मुंबई शहरी भागात २० मे रोजी मतदान होणार आहे.

का वगळली नावे?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार स्टार प्रचारक हे निवडणूक लढविणाऱ्या पक्षाचेच सदस्य असायला हवेत, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

BJP drops CM Eknath Shinde Deputy CM Ajit Pawar from list of star campaigners in Maharashtra
सोलापूर जिल्ह्यात वयाची शंभरी पूर्ण केलेले ३२०० मतदार! देशाच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीतही त्यांनी बजावला होता मतदानाचा हक्क, अजूनही तब्येत ठणठणीत

निवडणूक आयोगाचा आदेश?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार स्टार प्रचारक हे निवडणूक लढवणाऱ्या पक्षाचेच सदस्य असले पाहिजेत. त्यामुळे आता या आदेशानुसार विविध पक्षांना अशी नावे आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळवावी लागणार आहेत. अनेक पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करताना आपल्या मित्र पक्षातील नेत्यांच्या नावांचा समावेश केला होता. मात्र स्टार प्रचारक हा त्या पक्षाचाच सदस्य असावा असं आता निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे ही नावे वगळावी लागणार आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे वगळण्यात आली आहेत.

BJP drops CM Eknath Shinde Deputy CM Ajit Pawar from list of star campaigners in Maharashtra
मोठी बातमी! गुणांच्या टक्केवारीची पद्धत आता कायमची बंद; नवीन शैक्षणिक धोरण उच्च महाविद्यालयांमध्ये लागू होणार, प्रवेश प्रक्रिया व क्रेडिट पद्धती कशी असणार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.