Mumbai Bjp: भाजपच्या माजी नगरसेविकेला पतीची मारहाण; नेमकं काय आहे कारण?

भाजपच्या माजी नगरसेविकेला पतीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mumbai Bjp
Mumbai Bjp
Updated on

भाजपच्या माजी नगरसेविकेला पतीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांबाबत जाब विचारल्याने छळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (BJP former corporator husband harassment immoral relations )

भाईंदर पूर्वेतील भाजपच्या माजी नगरसेविका मेघना रावल यांना मारहाण, शिवीगाळ करून भाजपचा कार्यकर्ता असलेला पती दीपक रावल याने कोंडून ठेवल्याचा प्रकार उघड झाला. मेघना यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी पोलिसांनी दीपक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेघना या नगरसेविका असताना २०२० मध्ये पती दीपक यांचे एका तरुणीशी फोनवर सतत बोलणे सुरू असल्याचे त्यांना आढळले. त्यामुळे त्यांनी दीपक यांचा मोबाइल तपासला असता, त्यात तरुणीचे अश्लील फोटो दिसले.

त्याबाबत त्यांनी जाब विचारताच दीपक यांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. हा प्रकार सतत सुरू हाेता. मेघना यांना पती कोणत्याही कार्यक्रमासाठी जाऊ देत नव्हता व दमदाटी करत होता.

नेमकं घडलं काय?

२३ फेब्रुवारीला रात्री १० वाजेच्या सुमारास दीपक घरी आले व त्यांनी मेघना यांच्याकडे मिसळ बनवून मागितली. घरात त्यासाठी लागणारे फरसाण-चिवडा नसल्याने मेघना यांनी शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या नणंद शैला रावल यांना फोन करून त्यांच्याकडे या साहित्याची मागणी केली. त्याचा राग आल्याने दीपक यांनी मेघना यांना मारहाण करून स्वयंपाकघरात कोंडून ठेवले.

काही वेळाने शैला या घरी आल्या आणि त्यांनी मेघना यांची सुटका केली. त्यानंतर २४ फेब्रुवारीला पतीविरोधात शिवीगाळ, मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याची तक्रार मेघना यांनी नवघर पोलिसांत दिली. त्यावरून दीपक यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()