शरद पवारांवर महाजनांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'त्यांना माहिती होतं...'

Bjp girish mahajan critisize ncp sharad pawar over uddhav thackerya as maha rashtra cm
Bjp girish mahajan critisize ncp sharad pawar over uddhav thackerya as maha rashtra cm
Updated on

मुंबई : शिवसेनेत झालेल्या बंडानंतर पक्षाला लागलेली गळती सुरूच आहे, पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत, यादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच शिवसेना संपवायची होती असा घणाघाती आरोप भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. पवारांना माहिती होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले की शिवसेना संपेल आणि त्यामुळेच पवारांनी त्यांना मुख्यमंत्री केलं, असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. (Girish mahajan On shivsena)

शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीवर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, मी जाणीवपूर्वक बोलतोय की शरद पवारांना शिवसेना संपावायची होती, त्यांना माहिती होतं की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री झाले की शिवसेना संपली, असे महाजन म्हणाले. आज शिवसेनेवर वाईट दिवस आलेत, तुम्ही आमच्यासोबत राहीला असतात तर, मान-सन्मानाने राहिला असता, पुढच्या वेळी ६०-७० आमदार निवडून आले असते, आम्ही निवडूण आणले असते. महाविकास आघाडीसोबत जाणं ही राजकीय आत्महत्या आहे, यालाच आत्महत्या म्हणावे लागेल, असे गिरीश महाजन यांनी यावेळी म्हणाले.

Bjp girish mahajan critisize ncp sharad pawar over uddhav thackerya as maha rashtra cm
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या! अटक वॉरंट जारी

एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४० शिवसेना आमदारांना सोबत घेत केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला गळती लगल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे यांनी बंड केलं आणि राज्यातील महाविकास आघडीचे सरकार कोसळले, यामुळे शिवसेना पक्षाला हा मोठा धक्का ठरला, दरम्यान शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. आमदारांपाठोपाठ स्थानिक कार्यकर्ते तसेच खासदार ते नगरसेवक देखील एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत. यादरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आजपासून निष्ठा यात्रेला सुरूवात केली असून ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात दौरा करणार आहेत, सोबतच स्थानिक नेते आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत.

यातच शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात कायदेशीर लढाई सुरु असून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून धनुष्यबाण हे चिन्ह कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असे म्हणाले आहेत. धनुष्यबाण चिन्हचा निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Bjp girish mahajan critisize ncp sharad pawar over uddhav thackerya as maha rashtra cm
धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही; उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला विश्वास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.