'लोकांना छळायचं, मजा बघायची.. असा ठाकरे सरकारचा उरफाटा कारभार"

'लोकांना छळायचं, मजा बघायची.. असा ठाकरे सरकारचा उरफाटा कारभार" मुंबई लोकलसेवा अजूनही सुरू न केल्यामुळे भाजप नेत्याचा संताप BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray Govt over Mumbai Local Trains Issue
Uddhav-Thackeray-Mumbai-Local
Uddhav-Thackeray-Mumbai-Local
Updated on

मुंबई लोकलसेवा अजूनही सुरू न केल्यामुळे भाजप नेत्याचा संताप

मुंबई: राज्यातील कोरोना लॉकडाऊनची (Maharashtra Lockdown) नवी नियमावली (New Guidelines) जाहीर झाली. यात सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मुंबई लोकलबद्दल (Mumbai Local Trains) अद्यापही काहीच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. करोना लसीचे दोन डोस (Two Doses of Corona Vaccines) घेतलेल्या प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. तशातच, भाजपनेही (BJP) लोकल सुरू न केल्यास 'सविनय नियमभंगा'चा इशारा दिला होता. पण भाजपने या आंदोलनातून पळ काढल्याचा आरोप काँग्रेसचे सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी केला. त्यावर महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी सचिन सावंत यांना उत्तर दिले.

Uddhav-Thackeray-Mumbai-Local
"माज आला असेल तर..."; भाजप आमदाराचा Video झाला व्हायरल

"धन्यवाद. तुम्ही ट्वीट केल्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेसला सामान्य मुंबईकरांना छळण्यात कसा विकृत आनंद मिळतो हे दिसले. आम्ही योजना बदलली आणि पितळ उघडे पडले. सामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासावरून काल हायकोर्टाने थपडा मारल्या तरी तुमच्या सरकारला जाग आली नाही. लोकांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांना छळायचे आणि आंदोलन झाले की मजा बघायची असा उरफाटा कारभार आहे. आंदोलन तर होईलच सामान्य मुंबईकरांच्यासाठी.. पण महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून मिरवताना पण सामान्य मुंबईकराच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेण्याच्या ऐवजी कुचेष्टा करता, हेही जनता पाहते आहे", असा टोला केशव उपाध्ये यांनी काँग्रेसला लगावला.

Uddhav-Thackeray-Mumbai-Local
"कोरोनामध्ये सोनू सूद नावाच्या 'मसीहा'चा जन्म झाला होता, पण..."

दरम्यान, महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी आग्रही मागणी केली होती. मुंबईतील सामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना उपनगरीय प्रवासाची परवानगी न देणाऱ्या ठाकरे सरकारला धडा शिकविण्यासाठी सामान्य मुंबईकरांकडून २ ऑगस्ट पासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरु केला जाईल, असा इशारा केशव उपाध्ये यांनी दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.