BJP : ''औरंगाबाद की संभाजी नगर? औरंगजेब की सावरकर?, नेमकी भूमिका काय ते सांगा?'' भाजपकडून 'होर्डिंग'ची भाषा

ashish shelar news
ashish shelar newsSakal
Updated on

मुंबईः शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्याला भाजप नेते आशिष शेलार यांनी आज ट्वीट करुन जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये बोलतांना उद्धव ठाकरेंनी कोरोना लशीवरुन देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतला होता. मोदींची लस तयार केल्याने आपण जिवंत आहोत, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरेंनी असल्या लोकांना समीर चौगुलेंच्या दवाखान्यात मानसिक उपचार करायला पाहिजेत, अशी टीका केलेली.

ashish shelar news
Breaking News : पुणे-मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; 'या' भागांमध्ये स्फोट घडवून आणण्याचा इशारा

आशिष शेलार यांचं ट्वीट

''महाराष्ट्र आता फक्त होर्डिंग लाऊन उबाठाला विचारतोय... औरंगाबाद की संभाजी महाराज नगर? उस्मानाबाद की धाराशिव? अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यानगर? विरोधी की हिंदूत्व? कबर की प्रतिमा? आणि औरंगजेब की सावरकर? मर्द, खंजीर... शब्द न वापरता... उबाठा प्रमुखांनी महाराष्ट्राला स्पष्ट शब्दात सांगावे... यापैकी नेमके काय? की दोन्ही? नाही तर लहानपणीचा खेळ.. एवढं एवढं पाणी आणि गोलगोल गाणी"

असं ट्वीट भाजप नेते आशिष शेलार यांनी आज सकाळी केलं आहे.

ashish shelar news
#ArrestRaviNair : पंतप्रधान मोदींचे आक्षेपार्ह फोटो, साध्वी प्राचींनी केली अटक करण्याची मागणी; ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड

मोदी बाहेर देशात जावून भारताची मान उंचावतात, या भाजपच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंनी मोदींनी मनिपूरमध्ये जावून हिंसा थांबवावी, असं आवाहन केलं होतं. ठाकरेंच्या सगळ्याच टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. 'मोदींनी लस तयार केली म्हणजे त्यांनी प्रेरणा दिली' अशा आशयाचं विधान फडणवीसांनी केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.