कोल्हापूर: मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना घेऊन डुबतील अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत काल केली होती. यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यावर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले. आज ते कोल्हापुरात (Kolhapur) बोलत होते.
इतिहासात घडलेल्या घटना कायम राहत नाहीत
ज्या काही घटना इतिहासात घडलेल्या आहेत.त्या कायम राहत नाहीत काहीतरी निमित्ताने ओपण होतात. ९३ चा बाॅम्ब स्फोट यातून दाऊद पळून गेला. ९३ ते २०२२ आणि कालपासून ईडी चे धाडसत्र सुरु आहे. जसे अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh)बाबतीत झाले. परमबीर सिंग (Paramvir Singh) यांनी आरोप केले. त्यानंतर चौकशी सत्र सुरु झाले. म्हणून माझे म्हणणे आहे पारदर्शक काम करा. कधी काय बाहेर पडेल याचा नेम नाही. आता त्याबाबत अशी प्रतिक्रिया देण्यात काही अर्थ नाही.
शिवसेनेमधील मोठा गट देखील नाराज
चंद्रकांत दादा म्हणाले, सत्ता स्थापनेच्या वेळी कुणी कुणाला भरीस पाडले हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. या सत्तेचा उपभोग केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत आहे. छोटे घटक पक्ष सोडा पण काँग्रेस आणि शिवसेनेमधील मोठा गट देखील नाराज आहे. शरद पवारांच्या पेरोलवर राहून संजय राऊत हे शिवसेना संपवत आहेत हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात कधी येणार असा प्रश्न देखील चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला.
राऊत गल्लीतल्या मंडळासारखी भाषा करतात
संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत गल्लीतल्या दोन मंडळासारखी भाषा करतात, धमकी देतात. तब्येत बरी असेल तर सांगण्याची आवश्यकता नसते, मात्र तब्येत बरी नसली की मला काही झाले नाही हे वारंवार सांगावे लागते. यंत्रणेवर दोष देता म्हणजे तुम्ही घटनेवर दोष देत आहात असा आरोपही यावेळी केला.
त्या काळातला भाजप राहिलेला नाही
भाजप संदर्भात बोलताना म्हणाले, भाजप त्या काळातला राहिला नाही.ॲक्शनला रिॲक्शन येणार हे लक्षात घ्या. दोषी असतील ते जेलमध्ये जातील, भले ते भाजपचे असले तरी, ज्यांनी चुकी केली ते शिक्षा भोगतील.
पत्रकार परिषद अशी घेतात का?
राऊतांचा पत्रकार परिषदेत एकपात्री प्रयोग झाला. संजय राऊतां संबंधित किरीट सोमय्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. यामध्ये अब्रुनुसानीचा दावा दाखल करता येतो. कोर्टात जाऊन दाखल झालेल्या एफआर खारीज कराअशी विनंती करता येते. कोर्टामध्ये केस लढवून आपण निर्देष आहे हे सिध्द करता येते. मात्र सगळे मंत्री आले नाहीत म्हणून थयथयाट करायचे अशी पध्दत कधीपासून सुरु झाली. पत्रकार परिषद अशी घेतात का असा सवालही उपस्थित केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.