MVA: 'सुप्रिया ताई मुख्यमंत्री तर आदित्य उपमुख्यमंत्री होणार...', BJP नेत्याचा खळबळजनक दावा

ठाकरे-पवारांचा फॉर्म्युला समजल्यामुळेच शिवसेनेतील आमदारांनी उठाव केला
MVA
MVAEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री पदाच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. अशातच भाजपने मोठा दावा केला आहे. 'चालू पंचवार्षिकमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील. मात्र, २०२४मध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निश्चित केला होता असा दावा भाजपच्या बड्या नेत्याने केला आहे.' (Latest Marathi News)

तर पुढे ते म्हणाले कि, 'जाणीवपूर्वक शिवसेनेचे कमी आमदार निवडून आणायचे, असेही ठरले होते. ही गोष्ट समोर आल्यामुळे शिवसेनेतील आमदारांनी उठाव केला,' असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 'मोदी ९' अभियानांतर्गत भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत आयोजित केलेल्या पक्षाच्या 'टिफीन' बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.(Latest Marathi News)

MVA
Fathers Day 2023: जगण्याची सगळी चित्तरकथा..! फादर्स डे दिवशी सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, 'मविआचे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे मंत्रालयामध्ये येत नव्हते. त्यांच्या खिशाला कधी पेनही नसायचा. तर, अजित पवार उशिरापर्यंत मंत्रालयात थांबून काम करत असे. तर शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नव्हती.'(Latest Marathi News)

तर '२०२४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शंभर आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यामुळे आपण निवडून कसे येणार, अशी भिती शिवसेना आमदारांना वाटत असल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

MVA
Accident: राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.