त्या वक्तव्यासाठी नारायण राणेंच्या पाठीशी भाजप नाही- फडणवीस

Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Updated on

मुंबई- बोलण्याच्या भरात नारायण राणेंकडून वक्तव्य करण्यात आलं आहे. पण, एखादा मुख्यमंत्र्याबाबत असं वक्तव्य करणं योग्य नाही. त्यामुळे भाजप पक्ष अशा वक्तव्याचे समर्थन करत नाही. पण, राज्य सरकारकडून जी कारवाई केली जात आहे ती निषधार्ह आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय. याप्रकरणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीये. (Maharashtra Latest News)

मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात नारायण राणे यांनी जे काही वक्तव्य केलंय. त्यातून वाद निर्माण झाला आहे. बोलण्याच्या भरात त्यांनी असं वक्तव्य केलं होतं. पण, असं वाक्य वापरण्याचे त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीविषयी बोलताना संयम बाळगणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विसरतात, त्यामुळे एखाद्याच्या मनात संताप व्यक्त होऊ शकतो. पण, वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त होऊ शकतो. त्यामुळे नारायण राणे यांच्या त्या वक्तव्याच्य पाठीशी भाजप नाही, पण नारायण राणेंच्या पाठीशी भाजप पक्ष आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis
पुण्यातील नारायण राणेंच्या मॉलवर दगडफेक

हे सांगत असतानाच, राज्य सरकार त्यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई करत आहे त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. एखाद्याने वासरु मारले म्हणून आम्ही गाय मारु असं सरकार वागत असेल, तर भाजप पक्ष राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नाही. पण, नारायण राणेंच्या पाठीशी असेल. पोलीस ज्या पद्धतीने कारवाई करत आहेत. मला आश्चर्य वाटतं. शर्जिल उस्मानीवर कारवाई करण्याची पोलिसांची हिंमत नाही. पण, आता संपूर्ण पोलीस फोर्स सक्रिय झालं आहे, असंही ते म्हणाले.

Devendra Fadnavis
PM मोदींनी कसे नेते निवडलेत याची ही झलक; जयंत पाटलांचा टोला

कायद्याच्या भाषेत दखलपात्र गुन्हा नाही. पण, त्याला जाणूनबुजून दखलपात्र करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांना कोणी अधिकार दिलाय. आधी तुम्हाला बाजू ऐकून घ्यावी लागेल, मग निर्णय घ्यावा लागेल. पोलिसांचा गैरवापर सुरु आहे. पोलिसांचा आदर आहे, मी पाच वर्ष त्यांच्यासोबत काम केलंय. निष्पक्ष म्हणून महाराष्ट्र पोलिसांची ओळख आहे. पण, आता ऱ्हास सुरु असून काही पोलीस सरकारसमोर लोटांगण घालत आहेत. नियमाने असेल तर कारवाई योग्यच पण सरकारला खूष करण्यासाठी पोलिसांची कारवाई योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.