Narendra Patil : उद्धव ठाकरेंना हिंदुत्वापासून तोडण्यास शरद पवारच जबाबदार; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

भारतीय जनता पक्षापासून उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दूर करण्याचं काम शरद पवार यांनी केलं.
BJP leader Narendra Patil criticizes Sharad Pawar
BJP leader Narendra Patil criticizes Sharad Pawaresakal
Updated on
Summary

अजित पवार भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत आहे. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल १६ आमदारांच्या बाजूने लागणार आहे.

सातारा : भारतीय जनता पक्षापासून उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दूर करण्याचं काम शरद पवार यांनी केलं, तसेच उद्धव ठाकरेंना हिंदुत्वापासून तोडण्यास शरद पवार (Sharad Pawar) जबाबदार असल्याची टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख हे साताबाऱ्यावरील मराठा मुख्यमंत्री होते. कट्टर मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून, तेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याचं ‍श्री. पाटील (Narendra Patil) यांनी सांगितलं.

श्री. पाटील म्हणाले, 'अजित पवार भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत आहे. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल १६ आमदारांच्या बाजूने लागणार असून, जसा कालावधी पुढे जाईल तसे सरकार घट्ट होत आहे. दरम्यान, सारथी योजनेतून डेथ ऑफ रजिस्ट्रेशन करण्याची विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून, आता विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाणार आहे.'

BJP leader Narendra Patil criticizes Sharad Pawar
Karnataka : काँग्रेसनं 91 वेळा मला शिव्या दिल्या, त्यांनी आंबेडकर-सावरकरांनाही सोडलं नाही; मोदींचा हल्लाबोल

मराठा विद्यार्थ्यांना वसतिगृह बांधण्यासाठी शासकीय जागांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. येत्या वर्षभरात वसतिगृह सुरू केली जाणार आहेत. सारथी योजना गावागावांत लोकांपर्यंत पोचण्यासाठी योजनेत बदल केले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना दोन लाखांपर्यंत कर्ज महामंडळातून दिलं जाण्याची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बँकांशी करार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.

BJP leader Narendra Patil criticizes Sharad Pawar
Bazar Samiti Result : एकनाथ खडसेंना मोठा धक्का; 'या' बाजार समितीवर फुललं कमळ

अण्णासाहेब पाटील महामंडळातून राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज वितरण करण्यास अडचण येत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कऱ्हाड यांची भेट घेऊन राष्ट्रीयीकृत बँकांची बैठक घेऊन कर्ज वितरण करण्याबाबत चर्चा करण्याची विनंती करणार आहे, तसेच शहर व ग्रामीण भागातील योजना विस्तारण्यासाठी योजनेचे भाषांतर मराठीबरोबर इंग्रजी व हिंदी भाषेत केले जाणार आहे. दरम्यान, सातारा एमआयडीसीमध्ये गुंडगिरी सुरू आहे. त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना न्याय मिळण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार असल्याचे ‍श्री. पाटील यांनी सांगितले.

BJP leader Narendra Patil criticizes Sharad Pawar
Karnataka : ..तर काँग्रेस घालणार महिला आमदाराच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

शैक्षणिक कर्जाचा समावेश

अण्णासाहेब पाटील महामंडळातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळण्याची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सुरुवातीला देशांतर्गत कुठेही शिक्षणासाठी कर्ज दिले जाणार आहे. पुढील दोन वर्षांनंतर परदेशातील शिक्षणासाठी कर्ज मिळण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.