क्रूझवरील अमली पदार्थाच्या पार्टी प्रकरणी सुरु असलेलं राजकारण आता धार्मिक वळणावर पोहचलं आहे. या प्रकरणात एक खान अडकल्यामुळे नवाब मलिक त्याची दखल घेतायत, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये सुशांतसिंह राजपूत याचाही उल्लेख केलाय. खान हे अडणाव असल्यामुळे त्याला पीडित ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण सुशांतसिंह राजपूत हिंदू असल्यामुले त्याला ड्रग्जच्या आहारी गेल्याचं ठरवलं का? असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण फक्त ड्रग्ज आणि एनसीबीच्या कारवाई असं होतं. मात्र, त्यानंतर याला राजकीय रंग देण्यात आला. आता यालाच धार्मिक रंग दिला जात असल्याचं चित्र दिसत आहे.
नितेश राणे यांनी नेमकं काय केलेय ट्विट?
नबाव मलिकांची आदळआपट का सुरु आहे? कारण तो खान आहे, सुशांतसिंह राजपूत नाही. खान आडनाव असल्यामुळे तो पीडित आहे का? सुशांतसिंह राजपूत हिंदू होता म्हणून तो व्यसनाधीन झाला काय?
फडणवीस काय म्हणाले?
क्रूझवरील अमली पदार्थ प्रकरणात एनसीबीने तिघांना सोडल्याचे सांगून राजकारण केले जात आहे. ज्यांना सोडले, त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुलाच्या एक जवळच्या व्यक्तीचाही समावेश आहे, असा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला. सायंकाळी नागपुरात आल्यानंतर विमानतळावरच पत्रकारांशी बोलताना त्यांनी नवाब मलिक यांचे आरोप खोडून काढले. ते म्हणाले, एनसीबीने ज्याच्याविरोधात फोनमध्ये चॅट, कॉलसंबंधी काहीही पुरावे नाही, अशांची सुटका केली. अमली पदार्थ ही समाजाला लागलेली कीड आहे. याविरोधात काम करणाऱ्या एजन्सीच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचे गरज आहे. हा कुठल्याही पक्षाचा प्रश्न नाही, हा समाजाचा व तरुणाईचा प्रश्न आहे. परंतु दुर्दैवाने त्याचे राजकारण केले जात आहे. एनसीबीने सुटका केलेल्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याच्या मुलाच्या जवळच्या व्यक्तीचा समावेश आहे. परंतु, त्याच्याविरोधात काहीही पुरावे नसल्याने आम्ही त्याचे नावही घेणार नाही. तो क्लिन असल्याने त्याला बदनाम करणे अयोग्य आहे, असेही फडणवीस म्हणाले. एसीबीनेच स्पष्ट केले की पुरावे नसलेल्यांना सोडले, ते कोणत्या पक्षाचे होते, हा विषयच येत नाही, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.