केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी बार चालवल्याच्या आरोपाखाली चर्चेत आलीय.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या मुलीचा गोव्यात बेकायदेशीर बार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, अशी मागणी काँग्रेसचे (Congress) मीडिया व प्रचारप्रमुख पवन खेडा यांनी केलीय.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी बार चालवल्याच्या आरोपाखाली चर्चेत आलीय. स्मृती इराणी म्हणाल्या, माझ्या 18 वर्षांच्या मुलीवर काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी बिनबुडाचे आरोप केलेत. माझ्या मुलीचा दोष एवढाच की, तिच्या आईनं 2014 आणि 2019 मध्ये अमेठीत राहुल गांधींविरुद्ध निवडणूक लढवली होती. माझी मुलगी राजकारणात नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. ती एक सामान्य महाविद्यालयीन मुलगी आहे, अशी टीका इराणी यांनी काँग्रेसवर केलीय. एकीकडं काँग्रेस नेत्यांनी स्मृती इराणी यांच्या मुलीवर आरोप केलेत, तर दुसरीकडं शिवसेनेच्या (Shiv Sena) प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी स्मृती इराणींच्या मुलीचं समर्थन केलंय.
प्रियंका चतुर्वेदी यांनी इराणींच्या मुलीचं नाव न घेता एक ट्विट केलंय. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, 18 वर्षांच्या मुलीला कदाचित माहित नसेल की भारतात रेस्टॉरंट चालवण्याचा परवाना मिळविण्याची प्रक्रिया काय आहे. एखाद्या तरुणीनं आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी हा प्रयत्न केला असावा, त्यामुळं तिच्याकडून चूक झाली असावी. तिची बदनामी केली जावू नये. मी 19 वर्षांच्या मुलीची आई म्हणून हे सांगत आहे. राजकारण बाजूला ठेवून मी हे वक्तव्य करत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
स्मृती यांच्या मुलीच्यावतीनं हे आरोप फेटाळण्यात आले. त्यांचे वकील कीरत नागरा म्हणाले, त्या सिली सोल्स नावाच्या रेस्टॉरंटच्या ना मालक आहेत, ना त्याचे संचालन करतात. स्मृती यांनी हे आरोप फेटाळून लावत स्पष्ट केलं की, ही लढाई आपण न्यायालयात न्यायालयात लढू. काँग्रेसनं म्हटलं की, उत्पादन शुल्क विभागानं इराणी यांच्या मुलीला कारणे दाखवा नोटीस दिली होती. नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्याची कथितरित्या बदली करण्यात येत आहे. ही माहिती आरटीआयमधून मिळाली. इराणींच्या मुलीनं सिली बनावट दस्तऐवज देऊन बार लायसन्स मिळविले, असा आरोप खेडा यांनी केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.