रश्मी ठाकरे नंतर स्मिता ठाकरे भाजपच्या निशाण्यावर; राणे म्हणाले...

निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे.
रश्मी ठाकरे नंतर स्मिता ठाकरे भाजपच्या निशाण्यावर; राणे म्हणाले...
Updated on

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांच्यासाठी 19 बंगले विकत घेतले असल्याची माहिती पुढे आणली आहे. भाजपच्या या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान भाजप नेते निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांनी स्मिता ठाकरे (Smita Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. अंधेरी पश्चिमधील स्मिता ठाकरे मुक्ती फाऊंडेशन ची इमारत वसुली पासून ते मालमत्तेचे उल्लंघन करून वापरण्यात येत आहे. याविषयी कायदेशीर कारवाई न झाल्यास कोर्टात न्याय मागणार असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

Summary

अंधेरी पश्चिमधील स्मिता ठाकरे मुक्ती फाऊंडेशन ची इमारत वसुली पासून ते मालमत्तेचे उल्लंघन करून वापरण्यात येत आहे.

निलेश राणे म्हणाले, न्यायालयात दाद मागणार

निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबावर निशाणा साधताना म्हणाले, स्मिता ठाकरे मुक्ती फाऊंडेशन संस्थेला सांकृतिक केंद्र उभारण्यासाठी ३० वर्षाच्या भाडेतत्वावर ही इमारत शासनाने दिली आहे. सदर जागा देताना शासनाने एकूण १०२० चौ.मी. जागेचा ताबा देण्यात आला होता. परंतू संस्थेने एकूण २२३० चौ.मी. जागा बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतली आहे. त्यास शासनाने अद्याप मान्यता दिलेली नाही. संस्थेने भाडेतत्वावर करारनामा केला परंतु सदरचा करारनामा रजिस्टर करण्यात आलेला नाही.संस्थेला जागा देण्याची मान्यता देण्यात आली त्यावेळी ताबा मिळाल्यापासून तीन वर्षाच्या जमिनीवर सांस्कृतिक केंद्राचे बांधकाम करणे बंधनकारक आहे मात्र त्यांनी अद्याप बांधकाम ही केले नाही आणि याबाबत त्यांनी रितसर कोणताही माहिती दिली नाही. याबाबत जर अधिकाऱ्यांनी लक्ष नाही घातले तर मी न्यायालयात दाद मागणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

रश्मी ठाकरे नंतर स्मिता ठाकरे भाजपच्या निशाण्यावर; राणे म्हणाले...
'बेस्ट'च्या 3600 कोटींचा घोटाळा बाहेर काढणार- आमदार मिहिर कोटेचा

सगळे हिशेब ह्याच जन्मात चुकते करणार

दरम्यान ठाकरे सरकारवर निशाणा साधताना राणे म्हणाले, शिवसेनेचा सहसंपर्कप्रमुख रत्नागिरी-सिंधुदुर्ग (अप्पा) ‘शटल्या‘ पराडकर याने घरात घुसून जीवे मारण्याची मारण्याची धमकी दिली. तरीही त्याच्या नावावर साधे गुन्हे दाखल केले. दुसऱ्याच्या प्रॉपर्टीत जाऊन एका व्यक्तीला मारला तरीसुद्धा काही नाही. किती खालच्या थराचं राजकारण चाललय महाराष्ट्र बघतोय, सत्ता कधी कायमची नसते काही लोकं विसरलेत. आमचा दुसऱ्या जन्मात विश्वास नाही सगळे हिशेब ह्याच जन्मात चुकते करणार असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()