Chandrashekhar Bawankule: पक्ष उभारणीसाठी 18-18 तास काम करावं लागतं; बावनकुळे यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Raj Thackeray Bawankule
Raj Thackeray Bawankule Sakal
Updated on

Chandrashekhar Bawankule answer to mns raj thackeray

मुंबई- मोठा पक्ष आणि विश्वासामुळे लोक पक्षात येतात. आम्हाला फोडाफोडी करायची गरज नाही. पक्ष उभारण्यासाठी १८-१८ तास काम करावे लागते, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष पदावर एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बावनकुळे पत्रकार परिषदेत बोलेत होते.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी भाजपवर शाब्दिक हल्ला केला होता. भाजपने इतर पक्षाचे आमदार न फोडता पक्ष उभारायला शिकावं, अशी टीका त्यांनी केली होती. यावर बावनकुळे यांनी पलटवार केलाय. पक्ष उभा करण्यासाठी १८-१८ तास मेहनत घ्यावी लागते. तसेच पंतप्रधान मोदी यांच्यावर असणाऱ्या विश्वासापोटी लोक भाजपमध्ये येत आहेत. आम्हाला फोडाफोडीची आवश्यकता नाही, असं ते म्हणाले.

Raj Thackeray Bawankule
Sanjay Raut : सत्तेच्या बळावर सरकार पाडणे देशद्रोहच - संजय राऊत

राज ठाकरे यांनी बुधवारी पनवेलमध्ये सभा घेतली होती. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन राज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम झालेलं नाही. रस्त्यावरील खड्ड्यांकडे कोणीच लक्ष देत नाही. मी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही बोललो. पण, काम झालं नाही. सध्या सुरु असलेले राजकारण लज्जास्पद असल्याचं ते म्हणाले.

Raj Thackeray Bawankule
Raj Thackeray: राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; रस्त्यावर उतरुन मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी

राज ठाकरेंच्या टीकेचा बावनकुळे यांनी समाचार घेतला. भाजप आणि भाजप नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. आम्ही फोडाफोडी करत नाहीत. लोकच आमच्याकडे येतात. पक्ष उभा करण्यासाठी वेळ द्यावा लागतो, असं ते म्हणाले.

मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत. इतर कोणत्याही पक्षात जेवढे पक्षप्रवेश झाले नाही तेवढे पक्षप्रवेश सुरू आहेत. आमच्याकडे त्याची यादी आहे. लोकांना मोदींनी नऊ वर्षात केलेल्या कामाबाबत आनंद आहे. ते भाजपलाच मतदान करतील, असंही बावनकुळे म्हणाले (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.