Phulambri news : फुलंब्री विधानसभेसाठी सर्वाधिक इच्छुक भारतीय जनता पक्षात असल्याने प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचत आहे. परंतु काही दिवसांपूर्वी वरिष्ठ नेत्याच्या तंबी मुळे सर्वच इच्छुकांनी एकत्रित येऊन बैठकांचा सपाटा लावला आहे.
गावागावात बैठकीला एकत्र आले तरी मनाने दुभागलेले कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता भाजपाकडून फुलंब्री विधानसभेसाठी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यानंतरच अंतर्गत कलह समोर येण्याची शक्यता आहे.