भाजप महिला मोर्चा आक्रमक! अखेर संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल

sanjay raut
sanjay rautsanjay raut
Updated on

नवी दिल्ली : शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची घेऊन जातानाचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा फोटो चांगलाच चर्चेस कारण ठरला. काहींनी राऊत यांच्या बाजूने कमेंट केल्या आहेत. तर काहींना 'सत्ता कोणाच्या खाली', अशा कमेंट्स करत कानपिचक्या ओढल्या. भाजपने या फोटोवरुन टीका केल्यानंतर संजय राऊतांनी 'ही चु**** बंद करा' असं आक्षेपार्ह शब्द उच्चारून टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपने आक्षेप घेतला होता. तसेच संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांमध्ये धाव घेतली होती. त्या तक्रारींपैकी एका तक्रारीची दखल घेत आता संजय राऊतांविरोधात दिल्लीच्या मंडावली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sanjay raut
अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची कसोटी; सरकारला घेरण्याच्या तयारीत विरोधक

गुन्हा दिल्लीत दाखल

भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख दीप्ती रावत यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये कलम 500 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भातील काही टीव्ही क्लिपींग देखील त्यांनी सादर केल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की, घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीने जबाबदार पद्धतीने वक्तव्य करायला हवं.

मुंबईतही तक्रार दाखल

याशिवाय, भाजप नेत्यांविरुद्ध (BJP leaders) अश्लील तसेच स्त्रीयांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी शेरेबाजी (Abusive language) करणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार मुंबई भाजप महिला मोर्चातर्फे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine drive police station) नोंदविण्यात आली होती.

sanjay raut
संजय राऊत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवा; भाजप महिला मोर्चाची पोलीस तक्रार

राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना भाजप नेते**** आहेत, असे वक्तव्य दोनदा केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. मुंबई भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांनी ही तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून भारतीय दंडसंहितेच्या कलम 354 ए (1) व (4), 509, 504,500 नुसार सुयोग्य गुन्हा नोंदवावा, अशीही मागणी त्यात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.