Maharashtra Politics : राज्यात आणखी एक काका-पुतणे भिडणार! ठाकरेंच्या शिवसेनेत आज वाजत-गाजत होणार प्रवेश

uddhav thackeray sanjay raut
uddhav thackeray sanjay raut
Updated on

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेते उभी फूट पडली. यानंतर या दोन गटात राजकीय रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक नेते, पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाला. यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत पक्षबांधणीला सुरूवात झाली. दरम्यान आता पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात इन्कमिंग सुरू झाल्याचं पाहयला मिळत आहे.

उद्धव ठाकरे गटाची ताकद हळूहळू वाढताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातीलील शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर नगर जिल्ह्यातल्या राजकारणातील आणखी एक पुतण्या आज शिवसेनेत दाखल होत आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

uddhav thackeray sanjay raut
ISRO Scientist Death : चांद्रयान-३ प्रक्षेपणावेळी काऊंटडाऊनमागचा 'तो' प्रसिद्ध आवाज हरपला; इस्त्रो शास्त्रज्ञाचे निधन

संजय राऊत यांनी भाजपाचे नेते आणि श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे शिवसेना ठाकरे गटात आज प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे सायंकाळी ५ वाजता उद्धव ठाकरेंचं निवसस्थान मातोश्री येथे साजन पाचपुते यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या पक्ष प्रवेशामुळए ठाकरेंची ताकद वाढणार असून राज्यात आणखी एका काका विरुद्ध पुतण्याची अशी राजकीय लढत पाहायला मिळणार आहे

uddhav thackeray sanjay raut
Jalna : तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर जालना पोलिस अधीक्षक पदाचा पदभार 'या' अधिकाऱ्याकडे

"नगर जिल्ह्यातल्या राजकारणातील आणखी एक पॉवर फुल पुतण्या आज शिवसेनेत! साजन पाचपुते आज वाजत गाजत शिवसेनत प्रवेश करणार! मातोश्री. 5 वाजता." अशी पोस्ट संजय राऊत यांनी 'एक्स'वर केली आहे.

uddhav thackeray sanjay raut
Maratha Reservation : CM शिंदेंच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाबाबत आज महत्वाची बैठक; काय होणार निर्णय?

साजन पाचपुते कोण आहेत?

साजन पाचपुते हे बबनराव पाचपुते यांचे पुतणे आहेत. तसेच काष्टी तालुक्यातील सरपंच व बाजार समितीचे संचालक ही पदे देखील त्यांच्याकडे आहे. मात्र ते कुठल्याही पक्षात नव्हते. साजन पाचपुते यांचे खासदार संजय राऊत यांचे घनिष्ठ संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवून जिंकलीही होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()