'मागील 27 वर्ष गणेश नाईकांचं एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीप होतं.'
ठाणे : भाजप आमदार गणेश नाईक (MLA Ganesh Naik) हे एका महिलेसोबत 27 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) होते. या महिलेला धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी (Police) नाईक यांच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केलंय. कोर्टानं (Thane Court) नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय. त्यामुळं नाईक यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. नाईक यांच्याकडून आपल्या जिवाला धोका आहे, असंही या महिलेनं म्हंटलंय.
दरम्यान, सीबीडी पोलीस ठाण्यात (CBD Police Station) दीपा चौहान (Deepa Chauhan) या महिलेकडून गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मागील 27 वर्ष गणेश नाईकांचं महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीप होतं. 27 वर्ष संबंध असल्याचा सदर महिलेनं आरोप केलाय. इतकंच नाहीतर या रिलेशनशीपमधून या महिलेला एका मुलगा झालाय. आता मुलाला गणेश नाईकांनी स्वीकारण्यास नकार दिला. शिवाय, त्या महिलेला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप सदर महिलेनं केलाय.
दरम्यान, मार्च 2021 मध्ये आमदार गणेश नाईकांनी मला सीबीडी रेतीबंदर येथील लखानी टॉवर्ससमोरील इमारतीत बोलावून घेतलं. तिथं मी माझ्या मुलाला त्यांचं नाव देण्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी माझ्यासमोर बंदूक ठेवून मला त्रास देऊ नको, असं सांगत तू शांत राहिली नाहीस, तर मी स्वतःलाही संपवेन आणि तुम्हा दोघांनाही संपवेन, अशी धमकी दिल्याचा आरोपही महिलेनं तक्रारीत केलाय, अशी माहिती सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिलीय. दरम्यान, भाजप आमदार गणेश नाईक यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. परंतु, कोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय. आता २७ तारखेला नाईक यांच्या अंतरिम जामिनावर सुनावणी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.