मुंबई: राज्यात सध्या अत्यंत भयावह स्थिती निर्माण झाली आहे. विविध जिल्ह्यांत पावसाने थैमान घातल्याने २००हून अधिक लोकांचा बळी गेल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर केंद्रीय तसेच राज्यातील मंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. अद्याप राज्य सरकारकडून नुकसान भरपाई पूर्णपणे जाहीर झालेली नसली तरी भाजपचे वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदत जाहीर केली आहे. 'राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे', अशी माहिती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली. प्रसिद्धीपत्रक काढून त्यांनी ही माहिती सांगितली. (BJP MLA in Maharashtra to donate a month salary to flood affected people)
प्रसिद्धीपत्रकात आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे, "विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या झालेल्या बैठकीत भाजपाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय आम्ही केला आहे. त्यानुसार भाजपाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करुन घ्यावे. तसेच, पूरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत शासनाने करावी अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.
राष्ट्रवादीकडूनही मदतीची करण्यात आली घोषणा
पूरासंदर्भात काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीकडून मदत केली जाणार असल्याचे सांगितले. सहा जिल्ह्यातील 16 हजार कुटुंबांना 'राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट'मार्फत 16 हजार किट्सचं वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये भांडी, मास्क, पांघरुण आणि इतर जीवनावशक वस्तूंचा समावेश असेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथकं पाठवली जाणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.