'रामराजे आजपर्यंत पडद्यामागून खेळ्या आणि गेमाच करत आले आहेत.'
खटाव (सातारा) : महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगत आहे. आता भाजप आमदार (BJP MLA) जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यावर सडकून टीका केलीय. स्वतःच्या पक्षाशी, वरिष्ठ नेत्यांशी, सातारा जिल्ह्याशी आणि इथल्या जनतेशी आयुष्यभर बेईमानी करणारे रामराजे नाईक निंबाळकर सूर्याजी पिसाळांनंतरचे सर्वात थोर गद्दार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
ज्या पक्षानं भरभरुन दिलं त्या पक्षाशी आणि त्या पक्षाच्या प्रमुखांशी बेईमानी करायला कधीच मागंपुढं न पाहणार्या रामराजेंची इतिहासात गद्दार म्हणून नक्कीच नोंद होईल, असा टोलाही जयकुमार गोरेंनी लगावला. वाजपेयी यांच्यानंतर भाजपमध्ये आमदार जयकुमार गोरे थोर नेते आहेत, अशी टीका रामराजेंनी केली होती. त्याविषयी बोलताना गोरे म्हणाले, छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्वराज्याशी बेईमानी करणारे काही गद्दार होवून गेले. त्यात सूर्याजी पिसाळांचं नाव सर्वात अगोदर घेतलं जातं. यापुढं सूर्याजी पिसाळांनंतर आ. रामराजे यांचं नाव थोर गद्दार म्हणून घेतलं जाईल, असं गोरे म्हणाले.
गोरे पुढं म्हणाले, रामराजे आजपर्यंत पडद्यामागून खेळ्या आणि गेमाच करत आले आहेत. मदत करणार्यांचा काटा काढण्यात ते पटाईत आहेत. जिल्ह्यात स्वपक्षाच्याच आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील आणि इतर अनेकांचे काटे काढण्यात रामराजेंनी कधी मागेपुढे पाहिले नाही. ज्या पक्षाने त्यांना भरभरुन दिले त्या पक्षाशी सोयीनुसार गद्दारी करायला ते सर्वात पुढे असतात. राष्ट्रवादीत असूनही ते अजित दादांना विरोध करतात. जिल्हा बँकेत बसून खुशामतगार चार चौघांबरोबर बसून षडयंत्रे रचण्यात राजे वाकबगार आहेत. त्यांनी आजपर्यंत जिल्ह्याशी, इथल्या मातीशी आणि जनतेशी कायम गद्दारीच केली आहे. त्याबाबतीत त्यांचा कुणीच हात धरु शकणार नाही. माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यांबाबत त्यांच्या मनात नेहमीच आकस राहिला आहे. पृथ्वीच्या अंतापर्यंत या भागाला पाणी देता येणार नाही, असं हेच महाभाग नेहमी म्हणायचे. माण, खटावला पाणी मिळू नये म्हणून प्रयत्न करणारे रामराजे निवडणुका आल्या की माण, खटावात राजकारणाचा बाजार मांडतात, असंही गोरे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.