माझा पिंडच राजकीय संघर्षाचा, मला कोणीही थांबवू शकत नाही : जयकुमार गोरे

BJP MLA Jaykumar Gore criticizes NCP leaders
BJP MLA Jaykumar Gore criticizes NCP leadersesakal
Updated on
Summary

'राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बायकी पद्धतीचे गुन्हे दाखल करून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये.'

सातारा : मायणी मेडिकल कॉलेजचे (Mayani Medical College) विश्वस्त एम. आर. देशमुख हे निमित्त असून, माझ्यावर राजकीय आकसातून गुन्हे दाखल केले आहेत. त्यामागे संपूर्ण राष्ट्रवादी कॉँग्रेस असून, सभापतींच्या केबिनमध्ये याबाबतच्या बैठका झाल्या, असा आरोप करून माझा पिंडच राजकीय संघर्षाचा असून, मला कोणीही थांबवू शकत नाही. आमने सामनेचा संघर्ष करण्याची धमक राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांत नाही. आता त्यांच्या या राजकीय षडयंत्राला जशास तसे उत्तर देणार आहे, असा इशारा आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी पत्रकार परिषदेत दिला.

या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar), धैर्यशील कदम, भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, ‘‘मायणी मेडिकल कॉलेज मी चालवायला घेतले नव्हते. कॉलेजचे विश्वस्त एम. आर. देशमुख स्वतःहून माझ्याकडे आले. ते अडचणीत असल्याने मदत करण्याची विनंती केली. एमबीबीएसची शंभर जागांची त्यांची परवानगी असताना ९५० विद्यार्थ्यांचे ॲडमिशन घेतले. या ॲडमिशनपोटी प्रत्येक विद्यार्थ्याकडून १० ते ५० लाखांपर्यंतची फी जमा करून संबंधित ट्रस्टने ६८ ते ७० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला. या मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने येथे प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांचे बोगस शिक्के बनवून विद्यार्थ्यांचे प्रवेश पात्र ठरण्यासाठी बोगस गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र बनवण्यात आले. ७५० विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी २५, ३० व ५० लाख रुपये घेतले आहेत, याची यादी आमच्याकडे आहे. कॉलेजवर तब्बल दीडशे कोटी रुपयांचे कर्ज आहे. असे असताना आम्ही त्यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

BJP MLA Jaykumar Gore criticizes NCP leaders
समान नागरी कायदा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही; 'जमियत'मध्ये ठराव

विद्यार्थ्यांनी सुप्रिम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून कॉलेजला २० कोटी रुपयांचा दंड केला. विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्या मॅनेजमेंटच्या अटीवर आम्ही हे कॉलेज ट्रस्टी म्हणून चालवायला घेतले आणि आयुष्यात पहिल्यांदा आम्ही स्वतःच्या नावावर कर्ज घेतले. मात्र, देशमुखांनी कर्ज करायचे आणि ते आम्ही फेडायची असे होणार नाही.’’ प्रत्येक गैरव्यवहाराचा हिशोब हा झालाच पाहिजे. याकरिता या प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे तक्रार केली. या कॉलेजच्या निमित्ताने अनेक बोगस डॉक्टर तयार झाले असून, देशमुखांच्या घरातच पाच बोगस डॉक्टर आहेत. आर्थिक गैरव्यवहार कसा करावयाचा हे शिकण्यासाठी देशमुख परिवाराकडून नक्कीच प्रशिक्षण घ्यावे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

BJP MLA Jaykumar Gore criticizes NCP leaders
साताऱ्याच्या शहीद जवानाला अखेरचा निरोप; विसापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जमिनीच्या बोगस दस्त व्यवहारासंदर्भात बोलताना आमदार गोरे म्हणाले, ‘‘या प्रकरणांमध्ये माझी सही व शपथपत्र हे संपूर्णपणे खोटे आहे. यामध्ये जर मी अपराधी शाबीत झालो तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन. त्यांची तक्रार करण्याची इच्छा नव्हती. या प्रकरणांमध्ये आमदार गोरेंना कसे अडकवता येईल, यासाठी तक्रारी दाखल झाल्या. मात्र, आमदार गोरे घाबरणारा नाही. माझा मूळचा पिंड संघर्ष करण्याचाच आहे. या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्याविरोधात रचलेले हे राजकीय षड्यंत्र असून, अत्यंत हीन पातळीवर जाऊन माझ्यावर गुन्हे दाखल केले. याचा त्रास अगदी माझ्या कुटुंबीयांपासून ते कार्यकर्त्यांना भोगावा लागला आहे. निखळ राजकारणाची क्षमता राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाही. आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ही जोडी राजकारणात पुढे येत आहे हे काही जणांच्या पोटात दुखते, म्हणून त्यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या या खेळ्या सुरू आहेत. ज्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले.

BJP MLA Jaykumar Gore criticizes NCP leaders
BSP : रामपूर लोकसभा पोटनिवडणूक बसपा लढवणार नाही; मायावतींचा मोठा निर्णय

त्या संदर्भातल्या सरकारी वकिलांची फी सभापतींच्या केबिनमधून दिली जाते व त्याचे प्लॅनिंगसुद्धा त्यांच्या केबिनमध्ये ठरते, असा आरोप श्री. गोरे यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांचे नाव न घेता केला. यांच्यात जर धमक असती तर त्यांनी समोरासमोरच्या संघर्ष केला असता. त्यांच्यात ती कुवत नसल्याने देशमुखांच्या आडून माझ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला आहे; पण मी आता गप्प बसणार नाही. राष्ट्रवादीच्या या षडयंत्रास जशास तसे उत्तर देणार आहे. जे लोक काचेच्या घरात राहतात. त्यांनी काँक्रिटच्या घरात राहणाऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत, असा खोचक टोलाही त्यांनी या वेळी लगावला. माझ्या मेहुणीवर रात्री चार वाजता गुन्हा दाखल करून सकाळी सात वाजता मुंबईत अटक करण्यासाठी पोचणारे सातारा पोलिस मायणी मेडिकल कॉलेजच्या बोगस प्रकरणाची दीड वर्ष तक्रार करून तपास का करत नाहीत. यातच काय समजायचे ते समजते. पोलिसांनी आपला सचिन वझे होणार नाही, याची काळजी घ्यावी. कारण वेळप्रसंगी कोणताही उच्चपदस्थ मंत्री आपल्याला वाचवायला येत नाहीत, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘या प्रसंगात माझा पक्ष माझ्यासोबत संपूर्ण ताकदीने उभा असून, संपूर्ण प्रकरणांमध्ये मी आजपर्यंत कधी तडजोड केली नाही. प्रभाकर घार्गे (Prabhakar Gharge) हे माझे कट्टर विरोधक आहेत, तरीसुद्धा त्यांना माणुसकीच्या नात्याने भेटायला मी कारागृहामध्ये गेले होतो. जर मी रामराजे यांच्याशी तडजोड केली असती तर जिल्हा बँकेत माझेही तीन संचालक दिसले असते.’’

मुकाबल्यासाठी कायम सज्ज

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमने- सामनेची लढाई करावी, असे बायकी पद्धतीचे गुन्हे दाखल करून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये. त्यांचा मुकाबला करण्यासाठी आमदार जयकुमार कायमच सज्ज आहे, असे आव्हान गोरे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.