Maharashtra Politics: 'कोणाला किती दिवस आपल्याबरोबर ठेवायचं अन् कोणाला कधी...', भाजपा आमदाराचं मोठं वक्तव्य

हायकमांड देवेंद्र फडणवीसच, असल्याचं यांचं भाजपा आमदाराने म्हंटलं आहे
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal
Updated on

भाजप शिवसेना यांच्या युतीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि समर्थक आमदार यांनी या सरकारमध्ये सहभाग घेतला. अजित पवार यांच्या सत्तेत सहभागी होण्यामुळे अनेकांच्या मंत्रीपदाला कात्री लागली आहे. तर काही दिवसांपूर्वी या सरकारमधील मंत्र्यांमध्ये खातेवाटप करण्यात आलं. यावेळी अनेक आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत सहभागी करून घेतल्याने शिंदे गटातील आमदारांसह भाजपामध्येही नाराजी असल्याचं दिसून आलं. (Latest Marathi News)

तसेच पूर्ण बहुमतातलं सरकार असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत सहभागी करून का घेतलं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे . त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सातत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट का घ्यावी लागत आहे. त्यामुळे या सरकारचे हायकमांड दिल्लीत असल्याची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी एक विधान करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. (Marathi Tajya Batmya)

भाजप सातारा लोकसभा मतदारसंघाच्यावतीने साताऱ्यात टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे आणि जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.(Latest Marathi News)

Maharashtra Politics
Maharashtra Cow Milk Price: राज्यातील दूध उत्पादकांना सरकारकडून दिलासा, गायीच्या दूधाला मोठी दरवाढ

आमदार जयकुमार गोरे बोलताना म्हणाले कि, 'राज्यातील शिंदे सरकारचा हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत. कधी कोणाला सोबत घ्यायचं आणि कधी सोडायचं हे फडणवीस यांना चांगलंच समजतं. यामुळे समजनेवाले को इशारा काफी होता है, असं जयकुमार गोरे म्हणाले आहेत. आमदार गोरेंनी केलेलं हे विधान नक्की कोणासाठी होतं याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. गोरेंचा निशाणा जिल्ह्यातील अजित पवार गटाकडे तर नव्हता ना? अशा सुद्धा चर्चांना आता साताऱ्यात उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. (Marathi Tajya Batmya)

Maharashtra Politics
Maharashtra Assembly Session: राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमदारांना व्हीप बजावण्याची शक्यता; अधिवेशनात कोणाचा व्हिप चालणार?

जयकुमार गोरे म्हणाले, “आपल्या भारतीय जनता पार्टीने घेतलेला निर्णय खूप विचार करून घेतलेला आहे. आपलं नेतृत्व खूप सक्षम आणि खूप विचारी आहे. त्या नेतृत्वाला माहिती आहे, कोणाला आपल्याबरोबर घ्यायचं, कोणाला सोडायचं, कोणाला किती दिवस आपल्याबरोबर ठेवायचं आणि कोणाला कधी सोडायचं? हे सगळं आपल्या नेतृत्वाला माहिती आहे. तसेच या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत.” आमदार गोरे हे वक्तव्य करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत होते का? यावर आता चर्चा सुरू आहेत.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.