बैलगाडा शर्यतीबाबत नितेश राणेंची मोठी घोषणा; म्हणाले, फडणवीस...

bjp mla Nitesh Rane announcement price for bullock cart race bjp devendra fadnavis
bjp mla Nitesh Rane announcement price for bullock cart race bjp devendra fadnavis
Updated on

राज्यात बैलगाडा शर्यत ही चर्चेतला विषय आहे, या दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बैलगाडा शर्यतीसंबंधी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या विजेत्याला मोठं बक्षीस देण्याची घोषणा केलीय पण त्यासाठी त्यांनी एक अट देखील घातली आहे.

आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंवरून बैलगाडा शर्यतीची व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. या २२ सेकंदांच्या व्हिडिओसोबत त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ज्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, त्या वर्षी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या राजाला (फायनल सम्राटला) त्यांच्याकडून मोठं बक्षीस देण्यात येईल आणि हे बक्षीस एक मर्सिडिज गाडी असणार आहे.

bjp mla Nitesh Rane announcement price for bullock cart race bjp devendra fadnavis
म्हणून काँग्रेससोबत काम करणार नाही, प्रशांत किशोरांनी सांगितलं कारण
bjp mla Nitesh Rane announcement price for bullock cart race bjp devendra fadnavis
अहमदनगर : जवखेडे खालसा खटल्यातून तीनही आरोपी निर्दोष

दरम्यान सध्या गावोगावी यात्रा सुरू आहेत, त्यामुळे या गावच्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा सरकारकडून बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवल्याने गावोगावी शर्यतींचा धुरळा उडाला होता, राज्यभरात असंख्य ठिकाणी शर्यती उत्साहात आयोजित करण्यात आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()