वर्षा ठाकूर यांच्या नावे असलेला भूखंड रद्द करण्याचे नगर विकास विभागाने आदेश दिले होते.
राजकीय वर्तुळात बऱ्याच घटना घडत आहेत. एकमेकांवर सातत्याने अनेक राजकीय आरोपप्रत्यारोप सुरु असताना आता एक वेगळी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. आमदार ठाकूर (Prashant Thakur) यांच्या पत्नीच्या नावे वाटलेला 300 कोटींचा भूखंड रद्द करण्यात आला आहे. उलवे नोडमधील पुष्पकनगर मधील सेक्टर 26 मध्ये हा भूखंड आहे.
भाजपाचे (BJP MlA) आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष असताना 2019 मध्ये याचे वाटप करण्यात आले होते. ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांच्या नावे असलेला भूखंड रद्द करण्याचे नगर विकास विभागाने आदेश दिले होते. प्रशांत ठाकूर यांना संपर्क केला असता कॉलला प्रतिसाद नाही, अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु आहे. आता पुन्हा एकदा या घटनेमुळे भाजपा आणि महाविकास आघाडी असा संघर्ष पेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टोलेबाजी सुरु आहे. आता या बातमीमुळे हा संघर्ष आणखी टोकाला जाणार की कुणी माघार घेणार हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.