गानसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज निधन झाले. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. स्वरसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न लतादीदी यांच्या निधनाने भारतीयांसह जगातील असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपल्याची शोकभावना माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. (BJP MLA Sudhir Mungantiwar paid homage to Empress Lata Mangeshkar.)
लतादीदीनी गायन क्षेत्रात केलेला संघर्ष अनन्यसाधारण आहे. आपल्या स्वर्गीय स्वरांनी त्यांनी अवघ्या विश्वाला मोहिनी घातली .त्यांच्या निधनाची बातमी कानावर येताच मन सुन्न , निःशब्द झाले. त्यांच्या या दीर्घ गान प्रवासात त्यांचे सूर कधी अंगाई झाले , कधी तरुणाईचा आवाज झाला , अलवार प्रेमाचे प्रतीक झाला , या स्वर्गीय सुरांनी अनेकांचे भावविश्व समृद्ध केले. ये मेरे वतन के लोगो अशी आर्त हाक भारतीयांना देत लतादीदीनी शहीदांच्या बलिदानाची गाथा मांडली. मेरी आवाज ही पहचान है असे म्हणणाऱ्या दीदी त्यांच्या असंख्य गीतातुन आमच्या सदैव स्मरणात राहतील असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.