...त्यामुळेच राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट‘ झालंय - पडळकर

gopichand padalkar
gopichand padalkaresakal
Updated on

मुंबई: शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीची (shivsena-congress-NCP) आघाडीची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर टीका करण्याची एकही संधी भाजपचे (bjp) नेते सोडत नाहीत. त्यातच संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या बाजूनं सातत्यानं किल्ला लढवत असल्यानं ते नेहमीच रडारवर असतात. आता शॉपिंग मार्केटमध्ये वाईन (wine available in super market) मिळणार असल्यानं भाजपचे (bjp) विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राऊतांवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. काय म्हणाले पडळकर?

देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांमुळे राऊत पुरते बावचळले

जनाब संजय राऊत (sanjay raut) हे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘ झिंग झिंग झिंगाट ‘ झालं आहे. अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले

जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावच्या गावे अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला. जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का? की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार. परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही.

gopichand padalkar
7,200 कर्मचाऱ्यांची पोलीस भरती गृहखातं स्वत:च करणार, घोटाळे टाळण्यासाठी निर्णय

महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका

शरदचंद्र पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खुप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत. असे पडळकरांनी सांगितलंय.

gopichand padalkar
पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू, अजित पवारांकडून नवी नियमावली जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.