BMC Election: आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या हालचाली; कार्यकारिणीच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

‘नौ साल बेमिसाल’ अभियान राबविणार कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय
Ashish Shelar Devendra Fadnavis
Ashish Shelar Devendra Fadnavisesakal
Updated on

मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यावेळी आमचा महापौर होईल, असा दावा सर्वच पक्ष करत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक मुंबईत झाली. मुंबई महापालिका जिंकण्याबरोबरच लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळास नऊ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून ‘नौ साल बेमिसाल’ हा कार्यक्रम मुंबई भाजपच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत भाजपचे कार्यकर्ते मुंबईतील घरोघरी जाऊन संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या अभियानादरम्यान गेल्या नऊ वर्षांत भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामाचा प्रचार करण्यात येणार आहे.

दादर येथील वसंत स्मृती या भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यालयात झालेल्या या बैठकीस पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, महामंत्री संजय उपाध्याय, आमदार अमित साटम आदी आदी उपस्थित होते.

Ashish Shelar Devendra Fadnavis
Nana Patole: 'बसायला खुर्ची दिली नसल्याची खंत'; नाना पटोलेंनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं

बैठकीला उपस्थित असलेल्या मुंबईतील नेत्यांना मार्गदर्शन करताना भाजप नेते आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढताना मुंबई पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ५० नगरसेवकही निवडून येणार नसल्याचे भाकीत केले. ते उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले, की गेल्या २५ वर्षांत मुंबईकरांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला.

तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता कारण हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे.

Ashish Shelar Devendra Fadnavis
Jayant Patil: जयंत पाटील यांची चौकशी कशासाठी? नेमकं काय आहे कारण

आमच्यावर टीका करताना लोकांचे ऐका, मन की बात लोगो की सुनो, असे सांगत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ मुंबई शहरात दहा हजार ठिकाणी ऐकली गेली, असे शेलार यावेळी म्हणाले. प्रत्येक टीकेतून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो, असे सांगून ‘‘आम्ही बंद खोलीतून स्वतःच्या मनाशी स्वतः बोलणारे नाही आहोत. आम्ही खुल्या जनतेत बोलणारे नेतृत्व आहोत,’’ असा टोला शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. कर्नाटकचे निकालाबाबत बोलताना आत्मचिंतन करणार असल्याचे शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Ashish Shelar Devendra Fadnavis
Pune News: पुण्यात चप्पल चोर! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

...तर राज ठाकरेंविद्ध बोलणार

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना शेलार म्हणाले, राज ठाकरे यांना आमचे निवेदन आहे की, तुम्ही उत्तम बोलता. मोठे नेते आहात. अभ्यास करण्याचा प्रयत्न करता पण सगळ्याच बाबतीत तुम्ही बोलले पाहिजे आणि तुमचे बोलणे खरंच असेल असे मानण्याच काही कारण नाही.

व्यक्तिगत संबंधांमध्ये तुम्ही आमच्यावर व्यक्तिगत टीका केली तर त्याला आम्ही उत्तर देणार नाही पण जर तुम्ही माझ्या पक्षावर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केली तर तुमच्या विरोधात बोलायला मुलाहिजा ठेवणार नाही, असा इशारा शेलार यांनी दिला. दोन हजाराच्या नोटेवरची बंदी ही धरसोड वृत्ती नसून जे सुटलेले आहेत त्यांना धरण्याचा हा कार्यक्रम आहे. आरबीआयच्या ‘क्लीन नोट पॉलिसी’ या धोरणाच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()