Maratha Reservation : अतिरेक झाला की उद्रेक होणारच, मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; उदयनराजेंचा सरकारला कडक इशारा

'आरक्षणासाठी समाजाने शांततेच्या मार्गाने अनेक मोर्चे काढले; पण आता उद्रेक होत आहे'
Maratha Reservation Udayanraje Bhosale
Maratha Reservation Udayanraje Bhosaleesakal
Updated on
Summary

मराठा समाजाने ५७ मोर्चे काढले. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मराठा समाज सहन करतो, म्हणून त्याची परीक्षा पाहावी, असा त्याचा अर्थ होत नाही.

अंतरवाली सराटी : अन्य समाजाला न्याय मिळतो, मग मराठा समाजाला का मिळत नाही? इतर समाजाप्रमाणे मराठा समाजाला यापूर्वीच आरक्षण मिळायला पाहिजे होते. आरक्षणासाठी समाजाने शांततेच्या मार्गाने अनेक मोर्चे काढले; पण आता उद्रेक होत आहे. अतिरेक झाला, की उद्रेक होणारच. समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला दिला आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर (Jalna Maratha Reservation) शुक्रवारी पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. या घटनेनंतर शनिवारी दुपारी खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी गावात जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे- पाटील यांची भेट घेतली. लाठीचार्जमध्ये जखमी आंदोलकांची विचारपूस केली.

Maratha Reservation Udayanraje Bhosale
Jalna News : पोलिसांनी लाठीचार्ज केलेल्या अंतरवाली सराटी गावात तणावपूर्ण शांतता; डोक्याला पट्टी बांधून आंदोलकांचा उपोषणात सहभाग

दरम्यान, उदयनराजे व्यासपीठावर बसलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे आगमन झाले. आंदोलकांशी संवाद साधताना उदयनराजे म्हणाले, ‘‘मराठा समाजाने ५७ मोर्चे काढले. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मराठा समाज सहन करतो, म्हणून त्याची परीक्षा पाहावी, असा त्याचा अर्थ होत नाही. सर्व पक्षांनी विशिष्ट समाजाला घेऊन राजकारण केले; परंतु राज्यातील सर्वांत मोठ्या मराठा समाजाकडे दुर्लक्ष देखील केले.’’

Maratha Reservation Udayanraje Bhosale
Karad : लाठी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अन्यथा..; मराठा क्रांती मोर्चाचा स्पष्ट इशारा

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे

आंदोलक आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची लवकरच भेट घडवून आणली जाईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून आंदोलनासंदर्भात तोडगा काढू, असे आश्वासन उदयनराजे भोसले यांनी दिले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात टिकेल, असे आरक्षण द्यावे, असे आवाहन उदयनराजे यांनी केले.

Maratha Reservation Udayanraje Bhosale
Hasan Mushrif : शरद पवारांनी भाजपला आव्‍हान देताच मुश्रीफ म्हणाले, 'त्यातही आम्हाला क्‍लीन चिट मिळणार'

न्यायालयीन चौकशी सुरू करा

लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा निषेध करतो. याची चौकशी करून सर्वांना न्याय मिळाला. याप्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आवाहन करतो. याचा निश्चितपणे पाठपुरावा करू, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. जखमी रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावे. लाठीचार्जबाबत न्यायालयीन चौकशी सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.