राणेंच्या अडचणीत वाढ, अटक करण्यासाठी पोलिस रवाना

नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करा!
राणेंच्या अडचणीत वाढ, अटक करण्यासाठी पोलिस रवाना
Updated on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवलं आहे. नाशिकमध्ये नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांत नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक करण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत. समाजामध्ये तेढ, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ शकतो. त्यानुसार नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्यात येऊ शकतो. नाशिक पोलिसांची टीम कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे.

नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली.

राणेंच्या अडचणीत वाढ, अटक करण्यासाठी पोलिस रवाना
अफगाणिस्तानमध्ये 300 तालिबान्यांचा खात्मा, अनेकजण बंदी

मंत्रालयातील स्वातंत्र्यदिनाचा दाखला देत 'मी असतो तर कानाखाली चढवली असती', असे आक्षेपार्ह वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. जनआशिर्वाद यात्रा निमित्त नारायण राणे आज चिपळूनमध्ये आहेत. येथे नाशिक पोलिसांची टीम पोहचल्यानंतर त्यांना अटक करणार असल्याचे समजतेय. या सर्व घटनामुळे शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील संघर्ष समोर आला आहे.

राणेंच्या अडचणीत वाढ, अटक करण्यासाठी पोलिस रवाना
मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न; पुण्याच्या शेतकऱ्याचं निधन

काय म्हणाले होते राणे?

राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखालीच वाजवली असती,’’ असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त राणे यांनी महाडमधील पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की प्रगत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी असा मुख्यमंत्री असणे ही महाराष्ट्राची अधोगती आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान त्यांना नाही. आपल्याला माहीत नसेल तर सचिवाला विचारावे. त्यादिवशी स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव आहे काय, असे त्यांनी कोणाला तरी विचारले. देशाचा कितवा स्वातंत्र्यदिन आहे, हे त्यांना माहीत नाही. माझ्यासारखा तिथे असता तर कानाखालीच वाजवली असती. बाळासाहेबांच्या आदर्शाला तिलांजली देऊन गद्दारी करीत ते मुख्यमंत्री झाल्याची टीकाही राणे यांनी केली. पूरग्रस्तांबाबत राज्य सरकार योग्य मदतकार्य करत नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? -

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान त्यांचा गोंधळ उडाला. हा नक्की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव असा प्रश्न त्यांना पडला होता. यावेळी त्यांच्यामागे उभे असलेले मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना त्यांनी या संदर्भात विचारणा केली. तेव्हा कुंटे यांनी हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण पूर्ण केले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()