मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे दोन दिवसांपूर्वी बारामती दौऱ्यावर गेले होते. यावेळी फटाके वाजवा. पण धूर सोडू नका, असं म्हणाले होते. त्यावरुनच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union minister Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ''असे फटाके फक्त आघाडी सरकारच्या दुकानात मिळतात. असाच एक धूर बारामतीत सोडण्यात आला. त्याला आवाजही नव्हता धूरही नव्हता. फक्त वास होता'' असं नारायण राणे म्हणाले.
''संजय राऊतांचा अग्रलेखही वाचला. देशात काही पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये दादरा नगर हवेलीच्या निवडणुकीत एक जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकली. शिवसेनेनी मात्र आम्ही जिंकलो असा डंका सुरू केला. त्या उमेदवाराची निवडणूक निशाणी मागविली. त्यामध्ये फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची निशाणी आहे. दुसऱ्याच्या मुलाचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहे. डेलकर निवडून आल्या. आम्हाला मोठं यश मिळालं आता आम्ही दिल्ली काबीज करणार, असं म्हणतात'', अशी टीकाही त्यांनी संजय राऊतांवर केली.
'...तर डोक्याविना संजय राऊत दिसतील' -
''आम्ही दिल्लीत धडक मारू म्हणतात, पण धडक कशी मारतात हे माहिती नाही वाटतं. दिल्लीला धडक मारायला आले तर डोक राहणार नाही. डोक्याविना संजय राऊत दिसणार आहे. भाजपवर, मोदींवर टीकेचा भडीमार सुरू आहे. तुमचे ५६ आमदार आहात. ते मोदींमुळे निवडून आले आहेत. तसेच पवार कुटुंबीयांवर टीका करणारे मुख्यमंत्री हे त्यादिवशी पवारांची स्तुती करत होते. फक्त सत्तेसाठी हे सर्व केलं जात आहे,'' अशी टीकाही राणेंनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.