मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांचे आज निकाल (Maharashtra MLC Election Result) लागले. यामध्ये नागपूर आणि अकोला या दोन मतदारसंघात निवडणूक घेण्यात आली असून भाजपने (BJP) दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच सहापैकी चार जागा बिनविरोध निवडून गेल्या होत्या. त्यावरूनच आता भाजप नेते निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांनी ट्विट करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना (NCP President Sharad Pawar) टोला लगावला आहे. पण, पवारांना खोचक टोला लगावण्याच्या नादात राणे फॅक्ट विसरल्याचे दिसतेय.
निलेश राणेंचं ट्विट नेमकं काय? -
दोन दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना वाढदिवसाचं गिफ्ट मिळालं. विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला शून्य जागा मिळाल्या, असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे. तसेच त्यांनी निवडून आलेल्या सर्व भाजप उमेदवारांचे अभिनंदन देखील केलं. पण, पवारांना हा टोला लगावताना त्यांनी विधान परिषद निवडणुकीचा नीट अभ्यास केलेला दिसत नाही. कारण, सहा विधान परिषदेच्या जागांवर कुठंही राष्ट्रवादीचा उमेदवार दिसला नाही.
कोणत्या जागेवर कोणाला उमेदवारी? -
सहा जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या होत्या. यामध्ये कोल्हापूरच्या जागेवर भाजपच्या अमल महाडीक यांनी माघार घेत काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध आले. दुसरीकडं मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागाही बिनविरोध झाल्या आहेत. मुंबईत काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सुरेश कोपरकरांनी माघार घेतली होती. त्यामुळं भाजपचे राजहंस सिंग (Rajhans Singh) आणि शिवसेनेचे सुनील शिंदे हे बिनविरोध विधान परिषदेत जाणार आहेत. धुळे-नंदुरबारमध्ये भाजपकडून माजी मंत्री अमरिश पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या गौरव वाणी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, वाणी यांनी अर्ज मागे घेतला आणि ही जागा बिनविरोध भाजपच्या पारड्यात पडली.
नागपूर-अकोलासाठी निवडणूक -
नागपूर आणि अकोला, वाशिम, बुलडाणा या दोन मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये नागपुरात भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली होती, काँग्रेसने भाजपमधून आयात केलेले उमेदवार रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली. मात्र, भोयर यांची उमेदवारी मागे घेत अपक्ष उमेदवाराल काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला. यामध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला.
तर, दुसरीकडं अकोला मतदारसंघात भाजपकडून वसंत खंडेलवाल आणि महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे बाजोरिया यांना उमेदवारी दिली होती. यामध्ये भाजपच्या खंडेलवाल यांनी पहिल्यांदा विजय मिळवून विजयाची हॅट्रीक असलेल्या बाजोरिया यांना पराभूत केले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.