"लाथ मारा अशा खासदारकीला"; निलेश राणेंचं संभाजीराजेंंना आवाहन

BJP Nilesh rane urges to sambhaji raje chhatrapti to refuse rajya sabha mp seat by shivsena
BJP Nilesh rane urges to sambhaji raje chhatrapti to refuse rajya sabha mp seat by shivsena
Updated on

सध्या सहा जागांसाठी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. सहाव्या जागेवर कोणाची वर्णी लागणार यावरून सध्या राज्यातील राजकराण तापले आहे. छत्रपती संभाजी राजेंनी (Sambhaji Raje) राज्यसभा निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा करत सहाव्या जागेवर दावा केला आहे.यातच भाजप(BJP) चे नेत निलेश राणे यांनी त्या खासदारकीला लाथ मारा असे अवाहन संभाजी राजे यांना केले आहे.

निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्वीट करत म्हणाले आहेत की, "कोल्हापूरचे छत्रपती संभाजी, आज रात्रभर विचार करा की, ज्या पक्षाने मूक मोर्चा ला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले, औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले, पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला", असे अवाहन केलं आहे. दरम्यान आता संभाजी राजे काय भूमिका घेतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

BJP Nilesh rane urges to sambhaji raje chhatrapti to refuse rajya sabha mp seat by shivsena
केंद्रानंतर राज्याचा मोठा निर्णय! पेट्रोल 2.8 तर डिझेल 1.44 रूपयांनी स्वस्त

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आम्ही आमची उरलेली मतं छत्रपती संभाजी राजेंना देऊ, असं म्हटलं होतं. आता शिवसेनेकडून मात्र याउलट वक्तव्य आलं असून सहावी जागा लढणार असल्याचे सांगितले आहे. यापुर्वी संभाजी राजे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करत सर्व अपक्ष आमदारांना त्यांनी मत देण्याचं आवाहन देखील केलं होतं.

BJP Nilesh rane urges to sambhaji raje chhatrapti to refuse rajya sabha mp seat by shivsena
इंधन दर कपातीवर शरद पवारांची चार शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तसेच प्रत्येक पक्षाकडे असलेल्या संख्याबळानुसार, भाजपचे २, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा १ उमेदवार विजयी होईल. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एक-एक उमेदवार विजयी झाल्यानंतर त्यांच्याकडे काही मतं शिल्लक राहतात. ती संभाजी राजेंना देऊ, असे शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर आता शिवसेना दोन जागा लढणार असल्याची घोषणा अनिल परब यांनी केली आहे. म्हणजेच शिवसेना संभाजी राजेंना पाठिंबा देणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

BJP Nilesh rane urges to sambhaji raje chhatrapti to refuse rajya sabha mp seat by shivsena
संभाजीराजेंच्या उमेदवारीत पवार जिंकणार, उध्दव ठाकरे हरणार ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()