Maharashtra Politics : संजय राऊत अन् उद्धव ठाकरे हे पाकिस्तानी एजंट असल्याचा संशय; नितेश राणेंची टीका

uddhav thackeray sanjay raut
uddhav thackeray sanjay raut
Updated on

आगामी २०२४ ची लोकसभा निवडूक जिंकण्यासाठी भाजपकडून राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून ट्रेनने लोकांना बोलावून गोध्रा किंवा पुलवामा सारखा हल्ला केला जाऊ शकतो असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर भाजपचे नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी राऊतांसह उद्धव ठाकरेंवर देखील गंभीर आरोप केले आहेत.

हे पाकिस्तानी एजंट आहेत का...

नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे पाकिस्तानी एजंट आहेत का असा संशय आता वाटतोय. एकीकडे सर्व भारतीय राम मंदिराची वाट बघतायेत, सर्व राम भक्त आयोध्यामध्ये जाणार आहेत आणि एका ठिकाणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दंगली भडकतील अशा प्रकारची विधान करत आहेत. हज यात्रेला जेव्हा मुस्लिम बांधव जातात तेव्हा असली कुठलीही विधान ना संजय राऊत करत ना उद्धव ठाकरे करतात. पण हिंदूंचे कोणते सण आले किंवा राम मंदिर हा हिंदूंचा आयुष्यातला कुठला क्षण आला तेव्हा त्यांना दंगली भडकवण्याची विधान करायचेत.

uddhav thackeray sanjay raut
Pankaja Munde News : विश्रांतीनंतर पंकजा मुंडे पुन्हा मैदानात! देवदर्शनासाठी राज्यभरात करणार ५ हजार किमीचा 'शिवशक्ती' दौरा

उद्धव ठाकरेंचा इतिहास हा दंगली भडकवण्याचाच आहे. 2004 ला मातोश्री मध्ये बैठक झाली आणि दंगली घडवा अशा आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. मातोश्रीतील त्या बैठकीबद्दल आजपर्यंत कोणी मला टोकलेलं नाही. पुण्यात दंगली भडकवण्याच्या संदर्भात उद्धव ठाकरेंच्या निकटवर्ती यांची चौकशी झाली. नार्वेकर आणि किशोरी पेडणेकर. सांगलीत जी दंगल झाली त्याच्या मागे संजय राऊत यांचा हात होता असं धैर्यशील माने म्हणतात असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

uddhav thackeray sanjay raut
Lok Sabha Election : लोकसभा निवडणूकीपूर्वी गोध्राची पुनरावृत्ती? राऊतांनी व्यक्त केली मोठी भीती; म्हणाले, राम मंदिर...

तर पोलिसांना माहिती द्यावी...

संजय राऊत हे खासदार आहेत, उद्धव ठाकरे हे आमदार आहेत. त्यांच्याकडे जर का भारताविरुद्ध किंवा कोणताही कट रचणार आहे जर का अशी कोणतीही माहिती असेल तर एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी ती माहिती पोलिसांकडे द्यायला पाहिजे. अशी माहिती संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी पोलिसांकडे द्यावी, अशी मागणी देखील नितेश राणे यांनी केली.

पुढे बोलताना राणे म्हणाले की, मी सुद्धा एटीएसला पत्र लिहिणार आहे की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची सखोल चौकशी करावी. हवं तर नार्कोटेस्ट करावी आणि या सर्व गोष्टींचे आढावा सरकारने घ्यावा.

uddhav thackeray sanjay raut
Aditya L1 : 'सूर्यावर' म्हणजे नेमका कुठे जाणार आदित्य उपग्रह?

संजय राऊत काय म्हणाले होते?

आम्हाला भीती वाटते जसं गोध्रा केलं असं म्हणातात, त्याप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी देशभरातून ट्रेन्स आयोध्येला बोलवून, एखाद्या ट्रेनवर पुलवामाप्रमाणे हल्ला घडवून देशात धर्मांधतेचा आगडोंब तर उसळवणार नाहीत ना? अशी भीती लोकांना वाटत आहे. हे काहीही करू शकतात. जर पुलवामा घडवलं जाऊ शकतं असं म्हणतात, गोध्रा घडवलं गेलं असं म्हटलं जात आहे. तर अशाच प्रकारचं कृत्य २०२४ च्या निवडणूका जिंकण्यासाठी केलं जाऊ शकतं अशी भीती देशातील प्रमुख राजकीय पक्षांना वाटत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

तसेच पुढे बोलताना त्यांनी इंडियाच्या बैठकीत यावर चर्चा होईल. अशी भीती जनतेला देखील वाटत आहे. पण आम्ही अत्यंत सावध आहोत असे देखील खासदार संजय राऊत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.