मुंबई : एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी काल औरंगाबाद दौरा केला. एका महिला शाळेच्या उद्घाटनासाठी ते आले असताना त्यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण हे उपस्थित होते. त्यांच्या या दर्शनानंतर वादाला तोंड फुटलं होतं. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही यावरून एमआयएमवर टीका केली होती. त्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनीही ओवैसीला इशारा दिला आहे.
(MLA Nitesh Rane On Akbaruddin Owaisi)
काल औरंगाबाद दौऱ्यावर असताना आपल्या जाहीर सभेत त्यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्रातील सरकारवर टीका केली होती. त्याअगोदर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यामुळे वादाला तोंड फुटलं आणि अनेकांच्या टीकेचा धनी त्यांना व्हावं लागलं. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी याबद्दल ट्वीट करत ओवैसीला इशारा दिला आहे. "मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!" असं ट्वीट करत त्यांनी इशारा केला आहे.
दरम्यान दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय की, "या कारट्या ओवैसीला माहिती आहे का की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्या मध्ये "नामर्दांचे सरकार आहे"…" असं म्हणत त्यांनी सरकारवरही टीकास्त्र सोडलं आहे. त्याबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही ओवैसी यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी "मराठ्यांनी या औरंगजेबाची कबर बांधली, याच मराठी मातीत त्या औरंग्याची कबर आहे. तुम्हालाही या मातीत गाडायला आम्हाला वेळ लागणार नाही." असा इशारा केला असून तुम्ही फक्त दहा मिनिटांसाठी पोलिस बाजूला करा आम्ही याला औरंगजेबाकडे पाठवतो असा इशारा नितेश राणे यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.