BJP Planning For Baramati Constitution : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा डोळा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांच्या बारामती मतदार संघावर विजयी मोहोर उमटवण्यावर आहे. यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून, बारामतीमध्ये विजयाचा नारळ फोडण्यासाठी भाजपकडून उत्तर प्रदेशातील अमेठी पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेठीत ज्याप्रमाणे स्मृती इराणींनी लक्ष घालत काँग्रेसचा सुपडा साफ केला होता. त्याप्रमाणे बारामतीत पवारांना धूळ चारण्यासाठी बारामती मतदार संघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर देण्यात आली आहे.
यापूर्वी 2014आणि 2019 मध्ये भाजपाने बारामतीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात भाजपला यश मिळवता आले नाही. त्यामुळे आता अमेठी पॅटर्नचा वापर करून भाजप 2024 मध्ये पवारांच्या बारामतीत विजयी पताका फडकवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बारामतीत भाजपचा असा आहे प्लान
लोकसभेतील विजयसाठी देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील राज्यांमध्ये भाजपला यश मिळवण्यासाठी अशा मतदार संघांमध्ये जोरदार काम केले जाणार असून, यासाठी राज्याच्या पातळीवर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपाचे माजी मंत्री आणि विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. बारामतीमध्ये विजयी पतका फडकवण्यासाठी भाजपकडून आतापासूनच रणनीती आखण्यास सुरूवात करण्यात आली असून, त्यादृष्टीने भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बारामतीचा दौरा केला आहे. तर, येत्या 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान सीतारमण बारामती दौऱ्यावर येणार आहेत. बारामती विजयासाठी भाजपने 45 जागांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.
बारामतीत विजयाची जबाबदारी सीतारमण यांच्याकडे
अमेठीप्रमाणेच येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ हा देशाचे केंद्र बिंदू ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या मतदार संघाची जबाबदारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे सोपण्यात आली असून, त्यांच्याकडे या मतदार संघाचे प्रभारीपद देण्यात आले आहे. तर, दुसरीकडे सीतारमण यांच्या नेतृत्त्वाखाली बारामतीमध्ये परिवर्तन घडले असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींच्या काळात अनेक गड उद्धस्त झाले आहेत जेथे 40 40 वर्षांपासून एकाच पक्षाचे उमेदवार निवडून येत होते. या पद्धतीने बारामतीमध्ये देखील पवारांचा गड उद्धस्त केला जाईल असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.