राज ठाकरेंच्या भाषणावर भाजपची प्रतिक्रिया; फडणवीस, दरेकर म्हणाले...
मुंबई : मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारला आणि शिवसेनेला चांगलंच सुनावलं. त्यांच्या या भाषणावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (BJP reaction on Raj Thackeray speech Devendra Fadnavis Pravin Darekar)
फडणवीस म्हणाले, राज ठाकरे बोलतात ते सत्यच आहे. क्रमांक एकचा पक्ष हा बाहेर आहे आणि तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवतायत. मी त्यांचं संपूर्ण भाषण ऐकलेलं नाही त्यामुळं यावर जास्त काही बोलू शकत नाही.
राज ठाकरे याचं भाषण हे सर्वस्पर्शी आणि भविष्याचा वेध घेणारं वाटलं. यानिमित्त त्यांची हिंदुत्वाची भूमिकाही अधोरेखित झाली. या भाषणात अनेक मुद्दे पहायला मिळाले. हिंदुत्वाची भूमिका जातीपातीत विभागली न जाता एक हिंदू म्हणून देशपातळीवर सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात आणि सरकारच्या बेजबाबदार कारभारावर ताशेरे त्यांनी ओढले. सगळ्यात महत्वाचं देशाच्या सुरक्षेसंदर्भता त्यांनी महत्वाचं भाष्य केलं. मदरशांमध्ये नेमकं काय सुरु आहे. हे त्यांनी मांडलं. मदरशांमधून काय प्रशिक्षण दिलं जातंय याकडे त्यांनी लक्ष वेधलं, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
मुंबई महापालिकेत मनसेशी युती होणार का?
भाजपं भ्रष्टाचाराविरोधात सातत्यानं आवाज उठवत असताना मनसेची भूमिकाही मिळती जुळती आहे. येणाऱ्या काळात काय होईल हे माहिती नाही. पण भाजपच्या विचारांशी सुसंगत आणि महाराष्ट्राच्या विकासाची चिंता करणारी त्यांची भूमिका आहे, अशा शब्दांत दरेकरांनी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.