सोनिया गांधी (Sonia Gandhi) राहुल गांधींना पंतप्रधान करु इच्छितात, शरद पवार (Sharad Pawar) यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे.
Chandrashekhar Bawankule Tweet : एकीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (Narendra Modi) अमेरिकेत जाऊन देशाची मान उंचावत आहेत, तर दुसरीकडं मोदीजींच्या विरोधात गळा काढण्यासाठी विरोधक आज पाटण्यात एकत्र येत आहेत, असं ट्विट करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
मोदीजींना देशहिताची चिंता आहे, तर विरोधक स्वतःचं हित जपण्यासाठी एकत्र आलेत. एकत्र आलेल्या विरोधकांना जनतेची नाही तर आपल्या मुलांची चिंता आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) राहुल गांधींना पंतप्रधान करु इच्छितात, शरद पवार (Sharad Pawar) यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे.
उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंचं भविष्य दिसतंय. त्यामुळं आपल्या पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले आहेत. पण, देशातील जनता या विरोधकांचा डाव ओळखून आहे. २०१९ सालीही जनतेनं मोदीजींवर विश्वास टाकत फक्त आपल्या कुटुंबाचं हित बघणाऱ्या विरोधकांना घरी बसवलं होतं. आता २०२४ मध्येही जनता मोदीजींची साथ देणार असल्याचं ट्विट बावनकुळेंनी केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.