मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण चांगलच पेटलं आह, शिवसेनेकडून काही बंडखोर १२ आमदारांच्या निलंबनासाठी प्रयत्न केले जात आहेत. या घडामोडीदरम्यान काल एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस गुजरातमधील बडोदा येथे भेटल्याची माहिती समोर आली होती. आता यावर भाजप नेते सुधीर मुंनगटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (BJP Sudhir mungantiwar clearufication over devendra fadanvis eknath shinde meeting in gujrat)
मुंनगटीवार म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांच्या दररोज संपर्कात आहे, याबाबत त्यांनी कुठलंही वक्तव्य केलं नाही किंवा एकनाथ शिंदे यांना भेटायला जाण्याबाबत काही चर्चा देखील केली नाही. सतत चर्चा सुरू आहे पण त्यात भविष्यात येणाऱ्या निवडणूकीची पुर्वतयारी, विभागीय संमेलन आणि हैद्राबाद येथील राष्ट्रीय कार्यकारिणी बद्दलच्या चर्चा हा त्याचा भाग राहीला आहे असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना मुंनगटीवार म्हणाले की, या सत्तांतराच्या राजकीय नाट्यात आमची (भाजपची) भूमिका ही वेट अँड वॉच अशी आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे. शिवसेनेचे आमदार इतके कच्चे मेणाचे नाहीत की कोणी फूस लावली की बदलतील आणि एवढे दगडाचेही नाहीत की बदलणार नाहीत. कारण नसताना काही नेते भाजपचा हात असल्याचे बडबडतात. कारण नसतान भाजपवर आरोप केले जात आहेत. हे खालच्या दर्जाचे राजकारण केल्याचे मुनगटीवार यावेळी म्हणाले.
भाजपची भूमिका स्पष्ट आहे, तुम्ही गद्दारी केली २४ ऑक्टोबर २०१९ ला त्याची परिणाम तुम्हाला मिळत आहेत असा टोलाही त्यांनी मविआला लावला. बंडखोर गटाकडून कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही असे सुधीर मुंनगटीवार यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.